आई - बाबा, स्वत:साठी, आमच्यासाठी मास्क वापरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:50 AM2021-02-26T04:50:02+5:302021-02-26T04:50:02+5:30

शहरातील शालेय विद्यार्थ्यांनी टी.व्ही.वर आणि मोबाइलवर काॅल करतांना मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या आवाहन ऐकतात. तसेच दररोज ...

Mom - Dad, use a mask for yourself, for us! | आई - बाबा, स्वत:साठी, आमच्यासाठी मास्क वापरा !

आई - बाबा, स्वत:साठी, आमच्यासाठी मास्क वापरा !

googlenewsNext

शहरातील शालेय विद्यार्थ्यांनी टी.व्ही.वर आणि मोबाइलवर काॅल करतांना मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या आवाहन ऐकतात. तसेच दररोज घरातून बाहेर जाणारे आपले आई-वडील हे स्वत:च मास्क लावतात आणि सॅनिटायझरचा वापर करतात. सोबतही सॅनिटायझरची बाटली ठेवतात. घरात आजी-आजोबा यांनाही मास्क लावण्यास सांगतात. घरातल्या घरातसुद्धा सोशल डिस्टन्सिंग ठेवतात. मला सुद्धा आई-बाबा मास्क वापरण्यास सांगतात, असे शालेय विद्यार्थ्यांनी सांगितले.

काहींनी सांगितले की, आई-बाबा जर घाईत मास्क विसरत असतील तर आम्ही त्यांना आठवण करून देता. तसेच सायंकाळी घरी आल्यावर आई - बाबा हे घरातील कोणत्याही वस्तूला हात न लावता सरळ अंघोळ करतात, त्यानंतरच ते घरातील वस्तूंना हात लावतात. आता या गोष्टी आम्हाला अंगवळणी पडल्या आहेत. जर कोणी या गोष्टी विसरत असेल तर घरातील अन्य जण त्या गोष्टी लगेच लक्षात आणून देतात, असेही विद्यार्थ्यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.

आई - बाबा दररोज आम्हालासुद्धा मास्क वापरण्यास आणि सॅनिटायझरने हात धुवण्यास सांगतात. बाबा दररोज सकाळी कामावर जातांना मास्क लावतात. सायंकाळी परत आल्यावर आंघोळ करतात. आजी-आजोबानासुद्धा घरात आम्ही मास्क लावतात.

- आदिती शर्मा,

पार्वती नगर, मिल परिसर

आम्ही घरात सर्वजण मास्क वापरतो. आई-बाबा दोन्ही घरातून बाहेर जातांना सोबत सॅनिटायझर ठेवतात. परत आल्यावर अंघोळ करून कपडे बदलल्यावरच घरातील वस्तूंना हात लावतात. आम्ही सर्व आवश्यक ती सर्व काळजी घेतो.

- हर्षिता खलाणे,

वाडीभोकर रोड, देवपूर धुळे

Web Title: Mom - Dad, use a mask for yourself, for us!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.