शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

खुनाच्या प्रयत्नासह महिलेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 13:03 IST

मुस्लिम नगर : आठ जणांविरुध्द गुन्हा नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : पैशांच्या मागणीसाठी महिलेचा छळ करत तिच्या खुनाच्या प्रयत्नासह विनयभंग केल्याची फिर्याद चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली़ त्यानुसार आठ जणांविरुध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे़ मुस्लिम नगरात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे़ शहरातील मुस्लिम नगरात राहणारी (सध्याचे वास्तव्य आयशा नगर, चाळीसगाव रोड, धुळे) विवाहितेने आपली कैफियत महिला तक्रार निवारण कक्षाकडे मांडली़ त्याठिकाणी प्राथमिक चौकशी झाल्यानंतर चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात महिलेची फिर्याद नोंदविण्यात आली आहे़ माहेरुन पाच लाख रुपये आणावे या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला जात होता़ हाताबुक्यांनी मारहाण करत शिवीगाळ देखील केली जात होती़ तिच्या अंगावरील स्त्रीधन देखील काढून घेण्यात आले होते़ एवढ्यावरच न राहता तिच्या मानेच्या दिशेने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने चाकू मारला होता़ त्यानंतर तिचा गळा दाबून तिला मारण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता़ पण, सुदैवाने यात ती वाचली़ याशिवाय तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याने यात तिचा विनयभंग देखील करण्यात आला़ ही घटना १८ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली़ या घटनेनंतर पीडितेने महिला तक्रार निवारण कक्षाकडे न्यायासाठी धाव घेतली़ यात तिने आपली कैफियात मांडल्यानंतर चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात रविवारी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास फिर्याद नोंदविण्यात आली़ त्यानुसार, अलीम खाँ काझी, रईसा अलीम काझी, रहिम अली काझी, निलोफर रहिम काझी, सादीक खाँ अलीम खाँ काझी, सईद खाँ अलीम खाँ काझी, गुलशन मोहसीन शेख, रऊफ अलीम खाँ काझी (सर्व रा़ मुस्लिम नगर, धुळे) या संशयितांविरोधात भादंवि कलम ३०७, ४२०, ३५४, ४९८ (अ), ४०६, ४२७, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ पोलीस उपनिरीक्षक पी़ ए़ शिरसाठ घटनेचा तपास करीत आहेत़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी