शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आठ वर्षीय बालिकेचा विनयभंग, एक ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 12:40 IST

धुळे शहर : पोलिसात गुन्हा दाखल

ठळक मुद्देमुलीच्या मातेची पोलिसांकडे धावशहरातील एका अपार्टमेंटमधील घटना पोलिसांच्या तपासाअंती पहाटेच संशयित ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : आरडीचा फॉर्म देण्याचा बहाणा करुन एका आठ वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी शहरात घडली़ याप्रकरणी शुक्रवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले़ शहरातील गोळीबार टेकडी परिसरातील वैभव नगरातील अथर्व अपार्टमेंटमध्ये राहणाºया महिलेने शहर पोलिसात गुरुवारी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, आरडीचा फॉर्म देण्याचा बहाणा करुन मुलीला घरात बोलाविले़ तिचा विनयभंग करण्यात आला़ या घटना समजल्यानंतर लागलीच त्याचा जाब विचारण्यासाठी गेली असता मला अश्लिल भाषेत शिवीगाळ करण्यात आली़ गालावर चापट मारुन जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली़ ही घटना गुरुवारी सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास स्वामी अपार्टमेंटमधील एका घरात घडली़ याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास भादंवि कलम ३५४ (अ), ३२३, ५०४, ५०६ सह बालकांचे लैंगिेक अत्याचार प्रतिबंधक कायदा सन २०१२ चे कलम ८ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला़ घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक एच़ जे़ जाधव करीत आहेत़ दरम्यान, रात्रीच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली आणि स्वप्निल परदेशी (पूर्ण नाव माहित नाही) याला शुक्रवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास संशयावरुन ताब्यात घेतले आहे़ घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत़ 

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा