या कार्यशाळेला मोहाडीसह परिसरातील असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते. कृषी सहाय्यक प्रमोद पाटील यांनी याप्रसंगी गावातील सुपीकता निर्देशांकानुसार द्यावयाची खत मात्रा, सूक्ष्म अन्नद्रव्यांची पिकांना कशी गरज असते, जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी शेतकरी बंधूंनी काय काळजी घ्यावी, तसेच तणनाशकांच्या भरमसाठ वापराने सुपीक जमीन आपण स्वत:च कशी नापीक करीत आहोत, याचे अतिशय विस्तृत पद्धतीने मार्गदर्शन केले. याप्रसंगी त्यांनी मोहाडी गावातील प्रमुख अन्नद्रव्यांचा सुपीकता निर्देशांकाचा तक्ता डिजिटल पद्धतीने दाखवला, याप्रसंगी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळल्यास जमिनीची गुणवत्ता सुधारेल, त्याचबरोबर आपण उत्पादित केलेल्या मालाला जास्तीचा बाजारभाव पण मिळेल.
यावेळी उपसरपंच विलास गुजर, रवी पाटील, भीमराव पाटील, दीपक गुजर, अविनाश खैरनार, राजू पाटील, बापू सोनजे, विलास खैरनार, आबा नांदरे, रिंकू पाटील, सुभाष पाटील, भूषण सूर्यवंशी, शिल्पन गुजर , उपस्थित होते. निरंजन पेंढारे यांनी सूत्रसंचालन केले. इंजि. प्रमोद पाटील यांनी आभार मानले.