शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांनीच रोखली गौण खनिज चोरी; संगनमताने तस्करी होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 15:20 IST

धुळे तालुका पोलिसांनी वाहनचालकांना विचारणा केली असता त्यांच्याकडे शासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी नसल्याचे दिसून आले.

धुळे : महाराष्ट्र शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून अवैधरित्या गौण खनिज वाहतूक ग्रामस्थांनी रोखत ४ वाहन पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. याप्रकरणाने पुन्हा एकदा गौण खनिज तस्करांची हिम्मत वाढल्याचे बोलले जात असून यात प्रशासनातीलच काही अधिकारी, कर्मचारी सहभागी तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे.       धुळे तालुक्यातील अजंग शिवारात असलेल्या पाझर तलावातून रात्रीच्या सुमारास अवैधरीत्या गौण खनिज वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच अजंग गावातील जागरूक ग्रामस्थांना मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ धुळे तालुका पोलिसांना यासंदर्भात माहिती देत घटनास्थळी पाचारण केले. यावेळी ग्रामस्थांनी गौण खनिज तस्करांना बोलण्यात लाऊन ४ वाहन थांबवून ठेवल्याचे पोलिसांना दिसून आले. धुळे तालुका पोलिसांनी वाहनचालकांना विचारणा केली असता त्यांच्याकडे शासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी नसल्याचे दिसून आले.

यावेळी घटनास्थळी सदर वाहनाची कसून तपासणी केली असता त्यात लाखो रुपयांचे गौण खनिज आढळून आले. पोलिसांनी तत्काळ पंचनामा करत पोलीस सुरक्षेत चारही वाहनांना शहरातील प्रांत कार्यालयात जमा करण्यात आले असून सदर वाहनासह गौण खनिज तस्करांवर शासनाच्या रॉयल्टी व दंडा यासह कार्यवाही करण्यात यावी. तसेच गावात दोन वर्षापासून नॅशनल हायवे क्रमांक ६ व पेट्रोल पंपाच्या भरावासाठी बेकायदेशीररित्या कुठलीही रॉयल्टी न भरता अवैध गौन खनिजाची रात्रीची चोरटी वाहतूक प्रांत, तहसीलदार, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच यांच्या संगनमताने होत असून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार या गौण खनिजातून होत असल्याचा आरोप डॉ दिनेश माळी, किशोर अहिरे, चेतन गायकवाड, प्रदीप माळी, उमेश माळी, योगेश माळी यांनी केला आहे. 

येणाऱ्या काळात प्रशासनाने गौण खनिज माफियांविरोधत कडक कार्यवाही न केल्यास मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांना भेटून पुराव्यासह तक्रार करु, अन्यथा गौण खनिज माफियांविरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

टॅग्स :Dhuleधुळे