दिवसेंदिवस अल्पवयीन मुलींना कसले तरी आमिष दाखवून पळवून नेत असल्याच्या घटना घडत होत्या. त्यात लग्नाचे आमिष हेच प्रथमदर्शनी कारण असल्याचे चौकशीतून समोर येत होते. ही बाब पालकांकडून गांभीर्याने घेतली जात होती. पोलिसांकडूनदेखील जागृती होत असली तरी त्याला मर्यादा येत असतात. यामुळे आपल्या पाल्यासाठी आता पालकांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे. आपली मुलगी वयात येत असताना तिच्या गरजा कोणत्या, कोणते कारण सांगून बाहेर जात आहे, तिचे मित्र आणि मैत्रिणी कोण आहेत, यासह अनुषांगिक माहिती पालकांकडून घेतली जात होती. असे असले तरी आजच्या स्थितीत जनजागृतीमुळे मुली घरातून पळून जाण्याचे प्रमाण घटले आहे.
५० टक्के मुलींचा शोध लागेना
सध्या जग खूपच वेगाने वाढत आहे. जो तो वेगाने धावण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. कुटुंंबातील सदस्य एकमेकांपासून खूपच दूर जात असल्याचे म्हणावे लागेल. त्यांच्यातील संवाद कितीवेळा होतो, हा मुळात प्रश्न आहे. त्याचे प्रमाण कमी न होता वाढविण्याची आवश्यकता आहे. कुटुंबातील संवाद हा कुठेतरी हरवत असल्याचे वारंवार अधोरेखित होत आहे. अल्पवयीन मुली या कोणत्या ना कोणत्या कारणाने आमिषाला बळी पडत असतात. त्यात लग्न हे सर्वाधिक कारण असू शकते. ही बाबसुध्दा पालकांनी विचारात घेण्याची आवश्यकता आहे.
शोधकार्यात अडचणी काय
- मुली पळून जाणे किंवा कोणीतरी पळवून नेल्यानंतर पोलीस ठाण्यात पालकांकडून तक्रारी दाखल केल्या जातात. बऱ्याच तक्रारी या लागलीच दाखल होत नसल्याचे चौकशीतून समोर येत असते.
- मुली पळून गेल्यानंतर त्या आपल्या मागे कोणताही पुरावा ठेवत नसल्याचे पोलिसांच्या चौकशीतून समोर येत असते. परिणामी हीदेखील अडचण तपास यंत्रणेपुढे असल्याचे स्पष्ट होत आहे.
- मुलगी नेमकी कोणासोबत गेली, याची पुरेशी माहिती काही वेळेस पालकांकडे उपलब्ध नसते. ती अल्पवयीन असेल तर ठीक. पण, तीच मुलगी सज्ञान असल्यास पोलीसदेखील काही करू शकत नाहीत.
कोटसाठी
मुलगी अल्पवयीन असो वा सज्ञान. त्यांच्याशी पालकांनी कायम संवाद साधायला हवा. पालकांनी त्यांच्याशी कायम मित्रत्व जोपासायला हवे. तिचे मित्र नेमके कोण, तिचा कोणाशी संपर्क जास्त येत आहे, त्यांचीदेखील माहिती पालकांनी आपल्याजवळ ठेवायला हवी.
- चिन्मय पंडित, पोलीस अधीक्षक
ग्राफसाठी
२०१८ : २६
२०१९ : २०
२०२० : १६
२०२१ : १०