शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांच्या गावात आरोग्यसेवेचा बोजवारा

By admin | Updated: April 8, 2017 16:26 IST

रिक्त पदांमुळे येथे दाखल होणा:या रुग्णांवर होणा:या शस्त्रक्रिया व विविध सेवा प्रभावित झाल्या आहेत.

दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न बिकट : केवळ चार वैद्यकीय अधिका:यांवर मदार; मुख्य वैद्यकीय अधीक्षकासह दहा पदे रिक्तदोंडाईचा, जि. धुळे, दि. 8-  राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या गावातील प्रशस्त व विविध सोयींनी युक्त अशा उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी मुख्य वैद्यकीय अधीक्षकासह दहा पदे रिक्त आहेत.  रिक्त पदांमुळे येथे दाखल होणा:या रुग्णांवर  होणा:या शस्त्रक्रिया व विविध सेवा प्रभावित झाल्या आहेत.हे  उपजिल्हा रुग्णालय 50 खाटांचे आहे. त्यात स्थापनेपासून 46 पदे मंजूर आहेत. यात सात वैद्यकीय अधिका:यांची पदे मंजूर असताना प्रत्यक्ष चारच पदे भरली गेली आहेत, त्यामुळे तीन पदे रिक्त आहेत.  मुख्य वैद्यकीय अधीक्षक, परिचारिका दोन, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, सहायक अधिसेविका, सहायक परिसेविका असे प्रत्येकी एक पद रिक्त आहे. मागणी करूनही दुर्लक्ष या उपजिल्हा रुग्णालयात पुरेसे वैद्यकीय अधिकारी नेमण्याची मागणी जिल्हा शल्यचिकित्सक व नाशिकच्या  आरोग्य उपसंचालकांकडे करूनही अद्याप वैद्यकीय अधिका:यांची  नेमणूक  झालेली नाही. केवळ एकच पद भरले आरोग्य उपसंचालक  एल. आर. घोडके यांनी  22 फेब्रुवारीला दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयास भेट दिली होती. तेव्हा  इतर सुविधा व रिक्त पदे भरणार, असे आश्वासन दिले होते. परंतु, आजही दहा पदे रिक्त आहेत.महिलांच्या समस्या सोडवण्यात अडचण या उपजिल्हा रुग्णालयात  स्त्रीरोगतज्ज्ञ,  बालरोगतज्ज्ञ अस्थिरोगतज्ज्ञ, दंतचिकित्सक    नाही. स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्यामुळे  महिलांच्या आरोग्यविषयक समस्या सोडवण्यास अडचणी येत आहेत. परिणामी, महिलांना तपासणीसाठी धुळे शहरात जाण्याचा सल्ला दिला जातो.  पोलीस संरक्षण देण्याची गरज!दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात परिचारिकेला धमकावण्याची घटना ताजी असताना व शासनाने पोलीस संरक्षण देण्याची घोषणा करूनही  अद्याप उपजिल्हा रुग्णालयातील  कर्मचा:यांना पोलीस संरक्षण मिळालेले नाही. पोलीस संरक्षणाची मागणी येथील कर्मचा:यांनी केली आहे. रुग्णालयात गावगुंड व दारुडय़ांचा त्रास वाढल्याची तक्रार आहे.  दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षकाची नेमणूक करावी, बालरोग, स्त्रीरोग, अस्थितज्ज्ञ, भूलतज्ज्ञ आदींसह तीन वैद्यकीय अधिका:यांचीही नेमणूक करावी. काही दिवसांपूर्वी येथे कार्यरत परिचारिकेला मद्यपींनी दमबाजी करून रुग्णालयात धिंगाणा घातला, त्यामुळे येथे पोलीस संरक्षण मिळणे गरजेचे आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. वरिष्ठांकडे रुग्णालयात पुरेसे डॉक्टर व इतर कर्मचारी नेमणुकीची मागणी केली आहे.  पोलीस बंदोबस्त मागितला आहे, मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. - डॉ.ललित चंद्रे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय