लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शिरपूर तालुक्यातील पळासनेरजवळ ट्रक उलटल्याने आग लागली़ या आगीत ट्रक जळून खाक झाला असून ही घटन मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली़ यात दोन जणांना किरकोळ दुखापत झाली़ मुंबईहून आगपेटी आणि फटाके घेवून ट्रक हा मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरुन इंदौरकडे जात होता़ शिरपूर तालुक्यातील पळासनेरपासून पुढे ४ किमी अंतरावर भरधाव वेगाने जात असलेला ट्रक अचानक उलटला़ १२ चाकी असलेल्या ट्रकमध्ये आगपेटी आणि काही फटाके ठेवण्यात आली होती़ मात्र, ट्रक उलटल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आणि यात ट्रकने पेट घेतला़ या अपघातात दोन जणांना किरकोळ दुखापत झाली़ घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन बंब आणि पोलीस तातडीने दाखल झाले़ बंबाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले़ सुदैवाने या अपघातात जिवीतहानी झालेली नसली तरी ट्रकचे मात्र लाखोंचे नुकसान झाले आहे़ आगीचे लोण उंचापर्यंत पोहचले़
ट्रकने पेट घेतल्याने लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 16:50 IST
पळासनेरजवळील घटना : लाखोंचे नुकसान
ट्रकने पेट घेतल्याने लाखोंचे नुकसान
ठळक मुद्देपळासनेरजवळ आगपेटी, फटाक्यांचा ट्रक उलटला़मुंबई आग्रा महामार्गावर घडला अपघात़सुदैवाने जिवीतहानी टळली़