शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

मिटरमुळे दररोज पाण्याची ६० लाखाची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 17:15 IST

शिरपूरचा पाणीपुरवठा हायटेक : भविष्यातील लोकसंख्या वाढ लक्ष घेऊन केले नियोजन

सुनील साळुंखे ।लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : केंद्र शासनाच्या युआयडीएसएसएमटी या योजनेंतर्गत शिरपूर नगरपालिकेने सुमारे ३० कोटी ७७ लाख रूपये खर्चाच्या पाणी पुरवठा योजना ४ वर्षापूर्वीच करून शहरवासियांना मिटरनुसार बील आकारण्यात येत आहे़ त्यामुळे तब्बल ६० लाखाची दररोज पाण्याची बचत होत असल्याची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्षा जयश्रीबेन अमरिशभाई पटेल यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली़शहरातील रहिवाशांना दोन वेळेच्या मुबलक निजर्तंूक पाणी ऐवजी डिसेंबर २०१६ पासून ८ तास पिण्याचे पाणी दिले जात आहे़ विशेषत: विद्युत पुरवठा खंडीत झाला तरी जनरेटरद्वारे पाणी पुरवठा करण्याची सुविधा आहे़ या योजनेमुळे पाणी साठविण्याची आवश्यकता भासणार नसल्यामुळे डेंग्युसारखे आजार उद्भवणार नाहीत तसेच नेटवर्क प्रणालीद्वारे जलशुध्दीकरण केंद्र, रॉ वॉटर पंम्पींग स्टेशन व ७ जलकुंभचे नियंत्रण एकाच व्यक्तीवर केले जात आहे़माजी मंत्री अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या दूरदृष्टीतून व कल्पनेतून तालुक्यात जलसंवर्धनाचे काम केले जात आहे़ शहरातील नागरिकांना दरडोई दरदिवशी सुमारे १४० लिटर्स पाण्याचा पुरवठा केला जात आहे़ सध्या २० लाख लिटर क्षमतेचे ६ तर एक १० लाख लिटर क्षमतेचे असे एकूण ७ जलकुंभ आहेत़ शहरात १३ हजार ५४० नळ कनेक्शन धारक आहेत़ २४ तास योजनेत मिटरद्वारे पाणी दिले जात आहे़ रेडीओ फ्रिक्वेन्सी थ्री जी ट्रान्समिटींग वॉटर मिटर हे प्रत्येक ग्राहकाच्या घरी लावले गेले आहे़ जेणेकरून आॅटोमॅटिक पद्धतीने कोणता ग्राहक किती पाणी वापरतो ते समजत आहे़ त्याची विगतवारी नपा कार्यालयात होत असते़ या सुविधेमुळे जेवढे पाणी वापरणार तेवढे बील प्राप्त होणार आहे़ त्यामुळे सध्या वापरात असलेल्या पाणीपट्टीच्या निम्मे सुद्धा बीले काहींना मिळत आहेत़२४ तास पाण्याचा पुरवठा कसा, किती केला जात आहे हे पाहण्यासाठी जलशुध्दीकरण केंद्रात कंट्रोल रूम असली तरी पुन्हा नगरपालिका प्रशासनाला जागेवरच नगरपालिका कार्यालयात पाहण्यासाठी विशेष कंट्रोल रूम बांधण्यात आली आहे़ बऱ्याच वर्षानंतर करवंद धरणासह करवंद जॅकवेल जवळचा साचलेला गाळ काढण्यात आल्यामुळे साठवण क्षमता वाढली आहे़ पुढील २० ते २५ वर्षांच्या पाणी पुरवठ्याची व्यवस्था माजी मंत्री पटेल यांनी आजच करून ठेवली आहे.