शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाण्यासह पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठीच उपाययोजना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 22:26 IST

महापालिका प्रशासन। पावसाळ्याच्या अनुषंगाने कामाला मिळतेय गती

धुळे : शहरातील विविध नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर माती तर कुठे कचरा साचला आहे़ नाल्यांची स्वच्छता करण्यापुर्वी नाल्यात आलेली माती बाजुला करण्याचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले आहे़ या कामाच्या पहिल्याच दिवशी हमालमापाडी भागातील नाल्यासह राजवाडे नगरात येणारा नालाही स्वच्छ करण्यात आला़ सहायक आरोग्य अधिकारी चंद्रकांत जाधव यांनी स्वत: लक्ष देवून काम मार्गी लावले़दरवर्षी पावसाळा सुरु होण्यापुर्वी नाल्यांची स्वच्छता करण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून हाती घेण्यात येत असते़ यंदाही नाले सफाईचे काम हाती घेण्यात आले असलेतरी सुरुवातीला नाल्यात आलेली माती कोरुन बाजूला करण्याचे काम मार्गी लावले जात आहे़ हमालमापाडी भागात काही ठिकाणी बांधकाम झाल्यानंतर त्याची माती ही तिथेच टाकून देण्यात आल्याचा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आलेला आहे़ त्यामुळे यावर कारवाई करीत नाल्यात आलेली माती जेसीबी यंत्राच्या मदतीने बाहेर काढण्याचे काम शनिवारी सकाळपासून सुरु होते़हमालमापाडीनजिक असलेल्या नाल्यांच्या स्वच्छतेनंतर राजवाडे नगरातील नाल्याकडे प्रशासनाने आपला मोर्चा वळविला़ याठिकाणी देखील नाला स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले़ दिवसभर काम सुरु होते़टप्याटप्प्याने होणार स्वच्छतादरवर्षी नाला स्वच्छ करण्याचे काम पावसाळा सुरु होण्यापुर्वी केले जात असते़ यंदाही ते सुरु झाले असलेतरी अजूनही पाहिजे त्या प्रमाणात कामाला सुरुवात झालेली नाही़ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेची जवळपास सर्वच यंत्रणा कामाला लागली आहे़ त्यामुळे केवळ आवश्यक त्याच कामाला प्राधान्य दिले जात आहे़ नाल्यांची स्वच्छता करताना देखील प्राधान्यक्रम ठरविला जावून अंमलबजावणी केली जाणार आहे़संकट येण्यापुर्वीच लक्ष केंद्रीतपावसाळा सुरु झाल्यानंतर नाल्यांची स्वच्छता करण्यापेक्षा अगोदरच या कामांकडे लक्ष दिल्यास भविष्यातील अडचणी वेळीच दूर होण्यास मदत मिळू शकते़ लवकरच शहरातील मोठ्या नाल्यांची स्वच्छता मार्गी लावण्याचे नियोजन आखण्यात आले आहे़

टॅग्स :Dhuleधुळे