शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

‘माऊली’च्या दर्शनाची जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 10:54 IST

आषाढी एकादशी : जिल्ह्यात उत्सवासाठी विविध विठ्ठल मंदिरे सजली, भाविकांना लागली दर्शनाची ओढ

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :  जिल्ह्यात आषाढी एकादशीनिमित्त विविध विठ्ठल मंदिरात विठ्ठू माऊलीच्या दर्शनाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील भाविकांना दर्शनाची ओढ लागली आहे.शिरपूर/उंटावद - खान्देशातील प्रति पंढरपूर म्हणून दैवत असलेले तालुक्यातील बाळदे येथील विठ्ठल रूखमाईचे मंदिर व निमझरी येथील विठुरायाच्या मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त यात्रौत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे़ बाळदे येथे पंढरपूरच्या मंदिराप्रमाणेच येथील मंदिराची रचना असल्याने खानदेंशातील हजारो भाविकांचे हे प्रति पंढरपूर श्रध्देचे दैवत बनले आहे. प्रवेशद्वारा जवळच संत पुंडलिक महाराज, पायरीजवळ संत नामदेव, त्याशेजारी संत चोकोबा महाराज व पांडूरंगाच्या मंदिरासमोर गरूड हनुमंताचे मंदिर आहे. दरवर्षी आषाढी कार्तिकी एकादशीला पंढरपूरप्रमाणे येथेही भजन-किर्तन व महापूजेचा कार्यक्रम आयोजित केला जातो. आताही आषाढी एकादशीला महापूजेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. निमझरी गांव हे सातपुड्याच्या पायथ्याशी आहे. बºयाच वर्षापासून गावकºयांची विठ्ठल मंदिर व्हावे अशी इच्छा होती. त्यानंतर लोकसहभागातून विठ्ठल रूखमाईचे मंदिर उभारण्यात आले आहे़ याठिकाणीही यात्रा भरते.मंदिरात संत मिराबाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, गरूड, हनुमंत, कासव, गणपती आदी मुर्तींचा समावेश आहे.  यंदाही दर्शनासाठी येणाºया सर्व भाविकांना चहा, साबुदाण्याचा फराळ व केळी वाटप केली जाणार आहे़ आषाढी एकादशीनिमित्त भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष छगन गोरख गुजर व ग्रामस्थांनी केले आहे.बळसाणे - येथील विठ्ठल मंदिरात मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणी सोबत राम , लक्ष्मण , सिता , हनुमानाची व बाजूला सप्तशृंगी देवीच्या मंदिराची  स्थापना ह.भ.प. दामोदर महाराज यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे मंदिराचे पुजारी उमाकांत भट हे दररोज सकाळी मुर्तींना स्नान घालून पूजाअर्चा करतात तसेच मंदिरात पहाटे काकडा आरती होते काकडा आरती ला गावक?्यांची मोठ्या संख्येने उपस्थित राहते त्याचप्रमाणे सकाळी १० वाजता पूजा करण्यात येते व सायंकाळी पाच वाजता हरिपाठ होतो. दरवर्षी एकादशी ला भजनीमंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम होतो. तसेच वर्षातून दोनदा  आषाढी आणि कार्तिक एकादशीला श्री विठ्ठल रुक्मिणी ची महापूजा करण्यात येते. तसेच महिलांचा हरिपाठ , पुरुषांचा हरिपाठ हा कार्यक्रम होतो.त्यानंतर दिंडी निघते व प्रसाद वाटप होतो रात्री किर्तनाचा कार्यक्रम होतो. या मंदिरात परिसरातील भाविक दर्शनासाठी येत असतात. दिवसभर दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते.

दर्शनासाठी जाणाºया भाविकांसाठी जादा बस*१२ रोजी पहाटे ५ ते रात्री १० वाजेपर्यंत अखंड माऊली दर्शन सोहळा निमझरी येथे आयोजित करण्यात आला आहे़*प्रति पंढरपूर बाळदे व निमझरी येथे पांडूरंग व विठ्ठल रूखमाईचे दर्शनासाठी शिरपूर बसस्थानावरून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत़*स्वयंसेवी संस्थांकडून दर्शनासाठी जाणाºया भाविकांना रस्त्याच्या दुतर्फा फराळ, केळी, चहा व थंड पाण्याची सुविधेसह मंदिर परिसरात देखील फराळ व पाण्याची सुविधा करण्यात येणार आहे़*यात्रौत्सवानिमित्त मंदिर व परिसराची साफसफाई केली जात आहे़पंढरपूर यात्रौत्सवासाठी जादा बसेस ़़़*तालुक्यातील भक्तांसाठी १० रोजीपासून दररोज सकाळी ९ वाजता पंढरपूरकरीता गाडी सोडण्यात येणार आहे़ तसेच खेडेगावांतून पुरेसे प्रवाशी मिळाल्यास थेट त्या गावावरून बसेस उपलब्ध केली जाणार आहे़ भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन आगारप्रमुख वर्षा पावरा यांनी केले आहे़वाडी येथे दिंंडी सोहळ्याचे आयोजन*तालुक्यातील वाडी बु़ येथे सालाबादाप्रमाणे १२ रोजी विठ्ठल रूखमाई मंदिर संस्थेतर्फे पांडूरंगाची महापूजा, अभिषेक, दर्शन व दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे़ तसेच नामसंकिर्तनाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे़

टॅग्स :Dhuleधुळे