धुळे : शहरासह हद्दवाढ झालेल्या गावातील मुलभूत प्रश्न सुटत नसल्याने भाजपाच्या सत्ताधारी नगरसेवकांंनी महासभेत थेट जमिनीवर ठिय्या मांडून चटई आंदोलन केले़ विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनीही मनपा कारभारावर नाराजी दर्शवित आंदोलन केले़महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात सोमवारी ११ वाजता महापौर चंद्रकांत सोनार यांच्या अध्यक्षतेखाली महासभा घेण्यात आली़ यावेळी उपमहापौर कल्याणी अंपळकर, उपायुक्त गणेश गिरी, नगरसचिव मनोज वाघ आदी उपस्थित होते़अन्यथा सामुहिक राजीनामा देऊहद्दवाढीच्या गावातील मुलभूत प्रश्न सुटत नसल्याने नगरसेवकांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली़ नगरसेवक किरण आहिरराव, वंदना भामरे, संजय जाधव यांनी चटई टाकून सभेत बैठक मांडली़ आमच्या प्रभागात फिरणे आम्हाला मुश्किल झाले आहे़ वर्षभरात प्रभागात एकही काम झालेले नाही़ महापालिकेकडून विकास कामे होत नसतील तर आम्ही सामुहिक राजीनामा देवू असा इशारा हद्दवाढ गावातील नगरसेवकांनी दिला़कुठे गेले एक दिवसातपाणी देण्याचे तुमचे आश्वासनमुस्लिम प्रभागाकडे जाणीव पूर्वक अन्याय केला जात आहे़ प्रभागातील नागरिकांना ८ ते १० दिवसानंतर पाणी पुरवठा केले जाते़ त्यामुळे नागरिकांना आजही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे़ मनपा निवडणूकीत मतदारांना एका दिवसाआड पाणी देण्याचे आश्वासन भाजपाचे मंत्री गरीष महाजन यांनी धुळेकरांना दिले होते़ कुठे गेले तुमचे मंत्री आणि कुठे गेले तुमचे आश्वासन असा सवाल विरोधी पक्षनेता साबीर शेख यांनी केला़अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचे पुरावे माझ्याकडे आहे- नवलेशहरातील कचरा संकलनासाठी मोठ्या गाड्यांची आवश्यता असतांना देखील लहान ७९ घंटागाड्या खरेदी करण्यात आल्या, ओला-सुका कचरा संकलनासाठी १ कोटी रूपयांची तरतूद असतांना केवळ बॅनर लावून शहरात जनजागृती केली जात आहे, जीपीएस यंत्रणेसाठी कोणताही रूट तयार नसतांना देखील लाखो रूपये खर्च करण्यात आले, ९ ते १० महिन्यानंतर देखील घंटागाडीवर लक्ष ठेवण्यासाठी कक्ष स्थापन करण्यात आलेला नाही़ नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक दिलेला नाही़ त्यामुळे शहरात ठिक-ठिकाणी अस्वच्छता आहे़ त्यामुळे नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते़ ठेकेदाराची चुकी असतांना देखील अधिकारी त्यांना पाठीशी घालतो़ अधिकाºयांचे ठेकेदारांशी झालेले आर्थिक हितसंबधाचे पुरावे माझ्याकडे आहे़ विषय मार्गी लावा अन्यथा भ्रष्टाचार करण्याºया अधिकाºयांना अन्टी करप्शन विभागासमोर उभे करणार असा इशारा नगरसेवक शितल नवले यांनी सभेत दिला़नुकसान भरपाईचे आदेशपांझरा नदीकाठावरील रस्ते तयार करतांना मनपा मालकीचे १२ सार्वजनिक शौचालय विना परवानगी बांधकाम विभागाकडून दोन वर्षापूर्वी पाडण्यात आले आहे़ त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे़ वारंवार मागणी करून अधिकारी माहिती देत नाही असा आरोप नगरसेवक भगवान गवळी यांनी केला़ यावेळी महापौर सोनार यांनी परवानगी न घेता १२ शौचालय पाडणाºया संस्था, व्यक्ती, अधिकारी किंंवा विभागाकडून तत्काळ नुकसान भरपाई वसुल करा तसेच भरपाई न दिल्यास नोटीस अन्यथा गुन्हा दाखल करा असा आदेश दिला.
सत्ताधाऱ्यांचे महासभेत ‘चटई आंदोलन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 21:31 IST