उज्ज्वला चेतन भदाणे (रा. तऱ्हाडी) ही माहेरून घरखर्चासाठी १ लाख रुपये आणत नसल्यामुळे सासरची मंडळी छळ करीत होती़ ११ मे २०१८ पासून ८ दिवसांनंतर ते २८ जानेवारी २०१९ पर्यंत सासरी चोपडा व पुणे येथे आरोपीच्या घरी शारीरिक व मानसिक छळ केला जात होता़ विवाहितेस हाताबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्या अंगावरील स्त्रीधन काढून तिला माहेरी हाकलून दिले़
या त्रासाला कंटाळून तिने पती चेतन देविदास पाटील, सासरा देविदास धमनराव भदाणे, सासू नीलिमा देविदास भदाणे, गोपाल भगवंत पाटील, दीपक भगवंत पाटील सर्व राहणार संजीवनी कॉलनी, यावल रोड, चोपडा अशा ५ जणांविरोधात शिरपूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४९८ अ, ४०६, ३२३, ५०४, ५०६ व ३४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे़