शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील बहुसंख्य रस्ते सुस्थितीत असल्याची माहिती मनपातर्फे शासनाला सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 16:42 IST

महापालिका : न्यायालयीन प्रकरणासाठी शासनाला माहिती सादर

ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाºया प्रमुख जिल्हा मार्गांवरील एकूण खड्डयांपैकी २५ टक्के खड्डयांची तर राज्य महामार्गांवरील ४५ टक्के खड्डयांची दुरूस्ती करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद भदाणे यांनी दिली़ उर्वरीत खड्डयांच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्याचेही ते म्हणाले़खड्डे दुरुस्तीचे काम १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  :  रस्त्यांवरील खड्डयांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल एका जनहित याचिकेवर बाजू मांडण्यासाठी शासनाने मनपाकडून माहिती मागवली होती़ सदर माहिती मनपाने सादर केली असून त्यानुसार शहरात ४३५ किमीचे डांबरी व सिमेंटचे रस्ते असून त्यातील बहूसंख्य प्रमुख रस्ते सुस्थितीत असल्याचे मनपाने स्पष्ट केले आहे़मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेत शहरांमधील रस्ते सुस्थितीत व अपघात विरहीत ठेवण्याबाबत नमुद करण्यात आले आहे़ त्यानुसार धुळे शहरात सुमारे ४३५ किमीचे सिमेंट व डांबरी रस्ते आहेत़ त्यापैकी बहूतांश मुख्य रस्ते सुस्थितीत असून रस्ते दुरूस्तीबाबत आलेल्या निवेदनानुसार व निधीच्या उपलब्धतेनुसार रस्त्यांच्या दुरूस्तीची कार्यवाही करण्यात येत आहे़ सन २०१५-१६ च्या वित्तीय वर्षात रस्ता दुरूस्तीसाठी १ कोटी २५ लाख ५४ हजार ६१० रूपये खर्च करण्यात आला़ तर २०१७-१८ या वित्तीय वर्षाच्या अर्थसंकल्पात ७५ लाख रूपयांची तरतुद करण्यात आली असून त्यातून रस्ता दुरूस्तीची कामे प्रस्तावित आहेत़ तसेच स्थानिक जिल्हा न्यायालयातील सेवा प्राधिकरणाकडून आलेल्या तक्रारींची दखल घेण्यात येत आहे़ शहर हद्दीतून जाणारे सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या ताब्यातील रस्ते दुरूस्तीबाबत संबंधितांना सुचित करण्यात आले आहे़ त्याप्रमाणे कार्यवाही सुरू असल्याची माहिती महापालिकेने शासनाच्या विधी विभागाकडे सादर केली असून त्यानुसार न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले जाणार असल्याची माहिती मनपा सुत्रांनी दिली़