शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पोळा फोडण्यासाठी मानाची मिरवणूक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 18:57 IST

बैलपोळा सण ऐतिहासिक परंपरेनुसार अपूर्व उत्साहात साजरा केला जातो.

पिंंपळनेर :  पोळा म्हणजे शेतकºयांचा आवडता सण असतो. शेतकºयांची शेती कसण्याचे काम जो करतो तो म्हणजे बैल. त्यामुळे येथे बैलपोळा सण ऐतिहासिक परंपरेनुसार अपूर्व उत्साहात साजरा केला जातो. येथील पोळा फोडण्यासाठी गुलाल उधळून व वाजत-गाजत मराठा-पाटील समाज व सगरवंशीय जिरे पाटील समाजांची सामूहिक मानाची मिरवणूक निघते. ही परंपरा कित्येक वर्षांपासून कायम आहे. संपूर्ण पंचक्रोशीत येथील पोळा वैशिष्ट्यपूर्ण आहे. या ठिकाणी पोळा फोडण्याचा प्रथम मान हा मराठा-पाटील समाजाला आहे. या समाजाच्या सजविलेल्या बैलजोड्यांची मिरवणूक गावाच्या पश्चिमेला असलेल्या पानखेड दरवाजा येथून निघते. डफ, पिंगाणी वाजवत ही मिरवणूक अत्यंत थाटात काढण्यात येते. या मिरवणुकीत आकर्षकरीत्या सजविलेल्या बैलजोड्या पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी जमते. येथील गुरूदत्त मंदिरातील मारूतीरायाला प्रदक्षिणा घालून ही मिरवणूक बाजारपेठेत येऊन शिवाजी चौकात पोहचते. तेथे गुलालाची उधळण केली जाते. जुन्या ग्रामपंचायतीजवळ पोळा फोडला जातो. या मिरवणुकीनंतर सगरवंशीय जिरे पाटील समाजाच्या मिरवणुकीस श्री क्षेत्र मुरलीधर मंदीर संस्थान येथून प्रारंभ होतो. समाजाचे सर्व लोक सजविलेले बैल घेऊन या स्थळी जमा होतात. मंदिराला वळसा घालून एखंडे गल्लीतून वाजत गाजत ही मिरवणूक निघते. समाजबांधवांची मोठी गर्दी असते. या दोन्ही मिरवणुका सायंकाळी निघतात. त्या पाहण्यासाठी गावासह परिसरातून मोठ्या संख्येने ग्रामस्थ, तरूण या बैलपोळ्याचा आनंद लुटतात. दोन्ही मिरवणुका निघाल्यानंतर गावातील उर्वरीत शेतकरी वैयक्तिकरीत्या गावात सजविलेल्या बैलांची मिरवणूक काढतात. बैलांना मिरवतात. बैलांना फिरवून आणल्यानंतर दारापुढे बांधून घरातील सुवासिनी त्यांना ओवाळतात. पुरणपोळी, गहू खावू घालतात. नैवेद्य दाखविल्यानंतर घरातील मंडळी जेवणासाठी बसतात. वर्षभर बैलांसोबत राहणारा, त्यांची सेवा करणारा सालदारालाही या दिवशी मालकाच्या घरी जेवणाचे आमंत्रण असते. त्याचा आदरही केला जात असतो. अशा पद्धतीने या परिसरात येथील पोळा सणाचा अपूर्व उत्साह पहावयास मिळतो. पूर्वसंध्येलाच त्यासाठी होणाºया तयारीतच चुणूक दिसते. 

टॅग्स :Dhuleधुळे