शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

आजार टाळण्यासाठी कोरडा दिवस पाळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 1:43 PM

चंद्रकांत सोनार । धुळे : मान्सुन सुरू होण्याआधीच प्रत्येक घरात आरोग्यविषयी तक्रारी सुरू होतात़ त्यासाठी पावसाळा सुरू होण्यापुर्वी प्रत्येकाने ...

ठळक मुद्देरूग्णांनी शारिरीक व मानसिक तणाव टाळावापुरेशी विश्रांती घ्यावी, भरपूर पाणी प्यावेआरोग्यदायी आहार घ्यावा,
चंद्रकांत सोनार । धुळे : मान्सुन सुरू होण्याआधीच प्रत्येक घरात आरोग्यविषयी तक्रारी सुरू होतात़ त्यासाठी पावसाळा सुरू होण्यापुर्वी प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेतली पाहीजे़ पावसाळ्यात दुषीत पाण्याने आजाराची लागण होते़ त्यासाठी खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावे अशी माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ़ मधुकर पवार यांनी लोकमत शी बोलतांना दिली़ प्रश्न : डेंग्यू आजाराची लक्षणे व कशी काळजी घ्यावी ?उत्तर : एडिस इजिप्टाय प्रकारच्या डासांच्या विषाणू संसर्गीत मादिच्या चावण्यामुळे ह्या आजाराची लागण होत असते़ २०११ पासून जिल्ह्यात ७९६ डेंग्यूचे रूग्ण आढळून आले असून त्यापैकी १५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे़ डेंग्यू आजाराच्या लक्षणांमध्ये तीव्र ताप, डोके दुखी, उलटी, अंगदुखी, डोळयाच्या खोबणीमध्ये दुखणे, अंगावर लालसर पुरळ, तीव्र पोटदुखी यांसारखी लक्षणे दिसून येतात़प्रश्न : डासांचा प्रार्र्दुभाव टाळण्यासाठी काय करावे ?उत्तर : डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मच्छरदाणीचा वापर करावा, दारे खिडक्यांना जाळी बसविल्यास, डासांना अटकाव करू शकतो, घराच्या परिसरात कुठेही पाणी साचून डबके होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच डास प्रतिबंधक अगरबत्तीचा वापर केल्यास डांसाच्या प्रार्दुुभाव रोखता येवू शकतो़प्रश्न : साथीच्या आजारावर नियंत्रणासाठी मनपाकडून भुमिका काय?उत्तर : महापालिका कार्यक्षेत्रात दैनंदिन घरे, लोकसंख्या सर्वेक्षण करण्यात येत असून, खासगी रुग्णालये, प्रयोगशाळा, दवाखाने येथील रुग्ण शोधमोहीमही राबविली जात आहे. या सर्वेक्षणात कीटकजन्य आजार व साथीच्या रोगांचे रुग्ण आढळलेल्या परिसरात संबंधित नागरी आरोग्य केंद्रामार्फत तातडीने उपचार केले जात आहेत. त्याचप्रमाणे आढळून येणाºया तापाच्या रुग्णांना गृहितोपचार देणे, कंटेनर सर्वेक्षण, दूषित कंटेनर रिकामे करणे, बांधकाम सर्वेक्षण, रक्तनमुने गोळा करणे, हस्तपत्रके वाटून जनजागृती केली जात आहे़रूग्णांनी खबरदारी घेण्याची गरजताप येणे, खोकला येणे, घसा दुखणे, अतिसार, उलट्या होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अंग दुखणे ही स्वाईन फ्ल्यूची लक्षणे असून खबरदारीचा उपाय म्हणून सर्दी, खोकला आलेल्या व्यक्तीने अन्य व्यक्तींच्या संपर्कात येऊ नये, शिंकतांना किंवा खोकतांना तोंडावर रूमाल धरावा, डॉक्टरांनी दिलेल्या औषधाशिवाय गरम पाण्यात मीठ, हळद टाकून गुळण्या कराव्यात, गरम पाण्याची वाफ घ्यावी, वारंवार हात साबणाने व स्वच्छ पाण्याने धुवावेत, घरातील टेबल, टिपॉय, संगणकाचा पृष्ठभाग सतत स्वच्छ करावा,सार्वजनिक स्थळी स्वच्छता ठेवावी रूग्णांनी शारिरीक व मानसिक तणाव टाळावा, पुरेशी विश्रांती घ्यावी, भरपूर पाणी प्यावे, आरोग्यदायी आहार घ्यावा, धुम्रपान करणे टाळावे तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये़ स्वच्छता पाळावी असे उपाय केल्यास आजारावर नियंत्रण मिळविता येते़
टॅग्स :Dhuleधुळे