धुळे : सरकारकडून अद्याप ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना झालेली नाही़ त्यामुळे समाजाचा जनगणनेअभावी विकासापासुन वंचित आहे़ तत्काळ जनगणना करण्याचा निर्णय घेण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन खासदार डॉ़ सुभाष भामरे यांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे देण्यात आले़समता परिषदेचे अध्यक्ष नामदार छगन भुजबळ यांनी १९९२ पासून ओबीसी समाजाची जातवार जनगणना व्हावी म्हणून सातत्याने विविध आंदोलने, सभा, संमेलने आणि महामेळाव्यामधुन हा विषय मांडत आहेत़ ओबीसीचे जातीवार जनगणना झाल्याशिवाय ओबीसीची नक्की आकडेवारी व ओबीसींची स्थिती माहिती होणार नाही़ जनगणनेअभावी संपुर्ण समाज राष्ट्रीय विकासापासून वंचित राहीला आहे़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या निवडणूकीपूर्वी केद्र सरकारला ओबीसींची जातवार जणगणना २०२१ च्या जणगणनेतर करणार असल्याचे जाहीर केले होते़ त्यानुसार ओबीसी जणगणनेचे कार्य सुरू झाले आहे़ त्यासाठी राज्यात प्रशिक्षण शिबीरे घेण्यात येत आहे़ त्यासाठी जणगणना प्रबंधक घरोघरी जावून माहिती घेणार आहे़ परंतू या जणगणना फार्ममध्ये ओबीसींच्या जातवार जणगणनेचा कॉलम समावेश करण्यात आलेला नाही़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर करूनही ओबींसी समाजाची जातवार जणगणना वगळण्यात आली आहे़ तरी फेब्रुवारी महिन्या होण्याऱ्या अधिवेशनात ओबीसी जणगणनेचा मुद्दा उपस्थित करावा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले़ यावेळी राजेश बागुल, गोपाल देवरे, दिलीप देवरे, बी़बी़महाजन, दिनेश माळी, सतीष बाविस्कर, नंदकिशोर सुर्यवंशी, विशाल बिरारी आदी उपस्थित होते़
ओबीसींची जातनिहाय जनगणना करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 13:51 IST