शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने खासदार संजय राऊत, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, उत्तर महाराष्ट्र समन्वयक आमदार रवींद्र मिर्लेकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार, धुळे व नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात व जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांच्या शिफारशीने ही निवड झाली. वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी नुकतेच मुंबईत जैन यांना नियुक्ती पत्र प्रदान केले.
राज्यातील गरजू, आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात राखीव खाटा उपलब्ध करून देणे, निकषात बसणाऱ्या गरीब रुग्णांवर पूर्णत: माेफत आणि सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करणे, तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयांमध्ये गरजूंवर मोफत शस्त्रक्रियांसाठी मदत करण्यासाठी जैन यांची जिल्हा समन्वयकपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीचे शिवसेनेचे अतुल सोनवणे, हेमंत साळुंखे, भूपेश शहा, आधार हाके, किरण जोंधळे, शानाभाऊ सोनवणे, भरत राजपूत, प्रफुल्ल पाटील, डॉ. सुशील महाजन, ॲड. पंकज गोरे, पंकज मराठे, चंद्रकांत म्हस्के, हिम्मत साबळे, गिरीष पाटील, दीपक चारमुले, अमोल सोनवणे, चंद्रकांत देवरे, आदींनी स्वागत केले.