शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

प्रभू येशूच्या जन्माचे होणार स्वागत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 11:59 IST

सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवाणी : कॉन्व्हेंटचे विद्यार्थी करणार भगवान येशू जन्मावर नाटीका सादर 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : ख्रिस्ती बांधवांसाठी आनंदपर्व असणाºया नाताळ सणाची तयारी पूर्ण झाली आहे. घरोघरी आणि प्रार्थनास्थळांमध्ये धार्मिक प्रवचन, गाणी, कथा, नाटकासाठी चिमुकल्यांसह युवा-युवतींनी तयारी पूर्ण केली आहे.  ख्रिसमसची तयारी पूर्ण झाली असून, सोमवारी मध्यरात्रीनंतर या नाताळ साजरा करण्यासाठी उत्साहाला उधाण येणार आहे. येशू जन्माचा आनंद साजरा करण्यासाठी चर्चमध्येही रंगरंगोटी व रोशणार्ई करण्यात आली आहे़ तसेच  प्रार्थना आणि धार्मिक सांस्कृंतिक, पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़ सोमवारी मध्यरात्रीनंतर घरोघरी पारंपरिक प्रार्थना आणि फटाक्यांची आतषबाजी होणार आहे़चिमुकल्याचंी नाटिकाशहरातील अनेक चर्चमध्ये सोमवारी आणि मंगळवारी कॉन्व्हेंटचे विद्यार्थी भगवान येशू जन्मावर नाटिका सादर करणार आहे़ ख्रिश्चन बांधवासाठी दिवाळीप्रमाणे  नाताळ सणाचे महत्व असते़ म्हणून प्रत्येकाकडे चकली, करंजी, लाडू, डोनस आदी विविध गोड पदार्थ तयार केले जातात. नाताळाच्या एकमेकांच्या घरी गोडपदार्थ पाठवून, नाताळाच्या शुभेच्छा दिल्या जातात. एकमेकांना घरी फराळाला बोलावले जाते़ आकर्षक विद्युत रोषणाईनाताळनिमित्त पेस्ट्रीज, केकने सजलेल्या बेकºया, ख्रिसमस ट्री-आकाश कंदिलाने सजलेले रस्ते, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असे जल्लोषपूर्ण वातावरणनिमित्त ख्रिसमस तयारीच्या निमित्त करण्यात आली आहे़  जिंगल बेल, जिंगल बेल,  जिंगल आॅल द वे असे म्हणत मंगळवारी प्रभू येशूच्या जन्माचे स्वागत होणार आहे़़सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन प्रभू येशूच्या जन्माचे स्वागतासाठी महिन्याभरापासुन लहान मुलांनी नाटकांची तयारी केली आहे़ तर नाताळ निर्मित विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़ खरेदीसाठी बाजारात रेलचेलनाताळनिमित्त गर्दी होऊ लागली आहे़ यात विविध प्रकारचे शुभेच्छा पत्रे, सांताक्लॉजची टोपी ,कपडे, चॉकलेट, कॅडबरी, सजावटीचे विविध साहित्य उपलब्ध झालेले आहे. त्याचबरोबर रंगीबेरंगी मेणबत्या, आणि डिझायनर जिंगल बेल्सला मागणी होऊ लागली आहे.२४ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजता प्रार्थना करण्यात येणार आहे. २५ डिसेंबर रोजी दुपारीही विशेष प्रार्थना करण्यात येणार आहे. त्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

टॅग्स :Dhuleधुळे