शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गावे बदलताना पाहून  आनंद व समाधान, धुळ्यात अमीर खानचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 23:01 IST

पत्रकार परिषद : लामकानी गावात केले श्रमदान

ठळक मुद्देसिने अभिनेते अमीर खान यांनी केले लामकानीत श्रमदानधुळ्यात साधला पत्रकार परिषदेतून संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : वॉटरकप स्पर्धेमुळे गावांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. त्यामुळे स्पर्धेत सहभागी गावांमध्ये पाणलोटांचे मोठे काम उभे राहत असून त्यामुळे या गावांची पाण्याची समस्या कायमस्वरूपी मिटणार आहे. गावोगावी या स्पर्धेतील लोकांचा मोठा सहभाग व त्यामुळे होणारे काम पाहून गावे बदलत असल्याची खात्री पटते. त्यामुळे आनंद व समाधानही मिळते, असे प्रसिद्ध चित्रपट अभिनेता आमिर खान याने येथील पत्रकार परिषदेत सांगितले. त्याच्यासोबत त्याची पत्नी किरण राव याही होत्या. दरम्यान, धुळे तालुक्यातील लामकानी गावात सिने अभिनेते अमीर खान यांनी श्रमदान केले़ही अशी स्पर्धा आहे की ज्यात कोणीही हरत नाही. बक्षिस नाही मिळाले तरी त्या गावाने केलेल्या कामामुळे तेथील पाणी समस्या मिटलेली असते. गावांच्या समस्यांचे उत्तर गावांमध्येच आहे. ग्रामस्थांनी ठरविले तर काहीही कठीण नाही, याचा प्रत्यय या स्पर्धेच्या निमित्ताने येत आहे. बदल ही निरंतर प्रक्रिया असून गावांमध्ये हा बदल दिसत आहे. घरातील एखादी आपण स्वत: तयार केलेली वस्तू नादुरूस्त होते, तेव्हा नेमके काय झाले आहे, हे आपणास बरोबर समजते. त्याप्रमाणे गावांचे पाणलोटांचे आहे. लोक स्वत: हे काम करत असल्याने त्यातील काय योग्य, काय चूक हे त्यांना बरोबर समजेल, असेही त्याने स्पष्ट केले. स्पर्धेत सहभागी गावांनी जल साठवण क्षमता वाढवली आहेच; पण या मुळे गावांमध्ये जे ‘मनसंधारण’ झाले आहे ते अमूल्य आहे. सर्व जाती-धर्म व राजकीय विचारांचे लोक गावाकरीता एकत्र येऊन काम करत आहेत, ही मोठी गोष्ट असल्याचेही त्याने आवर्जून सांगितले.  

टॅग्स :Dhuleधुळे