लोकअदालतचे आयोजन
धुळे : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार धुळे जिल्ह्यातील जिल्हा व सर्व तालुका न्यायालयात १ ऑगस्ट रोजी विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एच. मोहम्मद यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश डॉ. डी. यू. डोंगरे यांनी दिली.
या लोकन्यायालयात न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे आणि वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात येतील. धनादेश न वटणे, मोटार अपघात भरपाई, कौटुंबिक वाद, वीज चोरी, भूसंपादनाची प्रकरणे ठेवण्यात येतील. वादपूर्व प्रकरणांमध्ये बँक, फायनान्स कंपनीची थकबाकी, कौटुंबिक वाद प्रकरणे ठेवण्यात येतील. न्यायालयात प्रलंबित प्रकरणात तडजोड झाली, तर कोर्ट फी स्टॅम्प १०० टक्के परत मिळतो. वेळ व पैशांची बचत होते.