लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : पोलिसांच्या दामिनी पथकाने शहरातील विविध लॉजेसवर जावून तपासणी करत चांगलीच झाडाझडती घेतली़ अचानक झालेल्या या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले होते़ दामिनी पथकासह पोलिसांनी शनिवारी सकाळी लॉजवर जावून तपासणी केली़ यासाठी पथकाची देखील नियुक्ती करण्यात आली होती़ गेल्या महिन्यात शहरातील एका लॉजवर विवाहितेचा खून झाला होता़ तर जिल्ह्यातही लॉजमध्ये नववधूच्या खुनाची घटना घडली होती़ लॉजेसमध्ये मुक्कामासाठी येणाºया ग्राहकांची कुठलीही नोंद ठेवण्यात येत नसल्याची गंभीर बाब तपासणीतून पुढे आली होती़ यानंतर काही लॉजेसमध्ये चालणाºया अश्लील उद्योगांचा प्रश्न ऐरणीवर आला होता़ लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेली पोलीस यंत्रणा आता बंदोबस्ताच्या ताणातून मुक्त झाल्यानंतर पोलीस दलाने अवैध व्यवसायांकडे मोर्चा वळविला आहे़ याचाच एक भाग म्हणून शनिवारी सकाळी लॉजेसची कसून तपासणी करण्यात आली़ अचानक झालेल्या या कारवाईमुळे मात्र लॉजेस मालकांमध्ये खळबळ उडाली होती़
लॉजेसची अचानक पोलिसांकडून तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 22:25 IST