शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीची तस्करी स्थानिक गुन्हे शाखेने रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 11:44 IST

एक संशयित ताब्यात : मुलीला केले पालकांच्या स्वाधीन

धुळे : साधारण एक वर्षापासून पळवून नेलेल्या मुलीचा शोध घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि त्यांच्या पथकाला यश आले आहे़ याप्रकरणी एकाला चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले आहे़ दरम्यान, त्या मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीनही करण्यात आले़धुळे जिल्ह्यात मागील वर्षभरापासून अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसत आहे़ त्याबाबत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल होते़ सदर मुलींचा अनैतिक मानवी वाहतुकीसाठी वापर होण्याची दाट शक्यता असल्याने त्यांचा त्यासाठी वापर होऊ नये यासाठी तात्काळ शोध घेऊन त्यांची अनैतिक मानवी वाहतूक होऊ नये म्हणून पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथक निर्माण करण्यात आले होते़ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली आणि त्यानुसार मंगळवारी देवपूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील पीडित मुलीस पळवून नेणारा मुलगा तिला घेऊन वलवाडी शिवारात येणार आहे़ अशी माहिती मिळताच वलवाडी शिवारात पोलिसांनी सापळा लावला होता़ पीडित मुलगी आणि तिला पळवून नेणारा मुलगा हे तेच असल्याची खात्री होताच पथकाने त्यांना ताब्यात घेतले आहे़ त्याची चौकशी सुरु असून त्या अल्पवयीन पीडित मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे़ पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक नंदा पाटील, अनिल पाटील, हनुमान उगले, हेड कॉन्स्टेबल सुनील विंचुरकर, महेंद्र कापुरे, पोलीस कर्मचारी गौतम सपकाळे, कविता देशमुख, केतन पाटील यांनी ही कारवाई केली़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी