शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
3
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
4
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
5
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
6
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
7
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
8
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
9
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
10
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
11
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
12
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
13
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
14
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
15
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
16
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
17
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
18
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
19
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
20
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
Daily Top 2Weekly Top 5

४० बिघे कोबी पिकात सोडली गुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 12:04 IST

कापडणे : बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल लोकमत न्यूज नेटवर्क कापडणे : मोठ्या अपेक्षेने, खर्च करुन वाढविलेल्या ...

कापडणे : बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिललोकमत न्यूज नेटवर्ककापडणे : मोठ्या अपेक्षेने, खर्च करुन वाढविलेल्या कोबी पिकाला बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने येथील शेतकऱ्याने ४० बिघे शेतातील कोबी पिक गुरांसाठी चरायला मोकळे केले आहे. तर काहींनी कोबीच्या शेतात रोटाव्हेटर फिरविला आहे.यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला पावसाचा खंड असला तरी पावसाळ्याच्या अखेरच्या महिन्यात आॅक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर २०१९ या तीन महिन्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने सर्वत्र नदी-नाले, कूपनलिका पाण्याने तुडुंब भरलेल्या आहेत.यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी दरवर्षीपेक्षा बागायतीचे क्षेत्र अधिक घेतले. शेती उत्पादन मोठ्या प्रमाणात निघत असल्याने त्याचा परिणाम मागणी कमी व पुरवठा जास्त असा झाला. यामुळे सर्वत्र शेती पिकांच्या उत्पादित मालाच्या भावात घसरणीला सुरुवात झाली आहे.कापडणे येथील ४० ते ५० शेतकºयांनी सुमारे ४० एकर शेत जमिनीत फुलकोबी व गड्डा कोबीचे पिक घेतले आहे. यासाठी प्रत्येक शेतकºयाने सुमारे तीस ते चाळीस हजार रुपये खर्च केले आहे. मात्र, कोबीला कवडीमोल भाव मिळत असल्याने कोबीचे उत्पादित पीक बाजारात घेऊन जाणेही परवडत नाही. मिळणाºया भावात गाडी भाडे देखील निघत नसल्याने तोटा अजून वाढत आहे.अखेर शेतकºयांनी तयार झालेल्या कोबी पिकाच्या शेतात गुरे, शेळ्या, मेंढ्यांना चरण्यास सोडले आहे. काही शेतकºयांनी कोबी पिकात रोटाव्हेटर मशीन फिरवून कोबीचे क्षेत्रफळ रिकामे केले आहे. काही शेतकºयांनी खरीप हंगामासाठी शेती तयार केली जात आहे.मार्केटमध्ये कोबी फेकून परतले शेतकरीकापडणे येथील भाजीपाला पीक घेणारे बहुतांश शेतकरी सुरत येथील सरदार मार्केटमध्ये कोबी विक्रीसाठी गेले.मात्र, भाव मिळत नसल्याने अक्षरश: मार्केटमध्ये कोबी फेकून परत आले. खिशातून गाडीचे भाडे द्यावे लागत असल्याने अखेर शेतकºयांनी कोबीच्या पिकात गुरे चारण्यास सुरुवात केली आहे.दीड ते दोन रुपये किलोचा भावसद्यस्थितीत फुलकोबी, गड्डा कोबी, कोथिंबीर, मेथी, मिरची, टमाटे, वांगे, दुधी भोपळा आदी भाज्यांना होलसेल मार्केटमध्ये दीड ते दोन रुपये किलोप्रमाणे भाव मिळत आहे. यामुळे शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे, असे कापडणे येथील कोबी उत्पादक शेतकरी सुरेश दयाराम बोरसे, अमोल सुरेश बोरसे, अनिल नथू सूर्यवंशी, नरेंद्र नथ्थू सूर्यवंशी, अधिकार माळी आदी शेतकºयांनी सांगितले.

टॅग्स :Dhuleधुळे