लोकमत न्यूज नेटवर्कनिमगूळ : शिंदखेडा तालुक्यातील निमगूळ येथील गावाच्या मुख्य भाग धर्मशाळा चौक असून या ठिकाणी पुरातन सार्वजनिक विहीर होती. या विहिरीसाठी लग्नसराईत महिलावर्ग पूजापाठही करतात. बऱ्याच दिवसापासून विहिरीला पाणी नसल्याने ओसाड विहिरीला खोदण्याचा संकल्प येथील धर्मशाळा, गढीभाग, कुंभारगल्ली भागातील तरुणांनी केला.गेल्या एक महिन्यापासून रात्री सर्व ग्रामस्थ एकत्र येत होते. रोज टिकम पावडी घेऊन मेहनतीने विहिरीत रात्री लाईट मोबाईल याद्वारे प्रकाश घेऊन श्रमदान करत होते.पन्नास फुट दगडी बांधकाम पूरातन या विहिरीला पाणी लागल्याने परिश्रम घेतलेल्या ग्रामस्थांनी जल्लोश केला. संपूर्ण गावात मुख्य चौकात आता एकमेव विहीर असून गावातील बाकी विहिरी आटल्यामुळे काही ग्रामस्थांनी बुजून टाकल्या आहेत.धर्मशाळा चौकातील पूरातन विहिरीवर पाणी संपूर्ण गाव एक वेळेस भरत होते व त्या भुतकाळाच्या आठवणींचा उजाळा ग्रामस्थांनी एकजुटीने मेहनतीने केला. या श्रमदानात बालगोपालांसह अबालवृद्धही सहभागी होते.
पडीक पूरातन विहिरीला केले जिवंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 12:05 IST