शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

मद्यविक्रीची दुकाने आजपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 23:15 IST

शहरासह २५ किलोमीटर आतील सर्व मद्यविक्रीच्या दुकानांना हा आदेश लागू

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : येथील महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून  ९ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार असून १० रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर ७ डिसेंबरच्या संध्याकाळी ५ वाजेपासून ते मतदान व मतमोजणी रोजी संपूर्ण दिवस मनपा हद्दीतील व हद्दीपासून २५ कि.मी. आतील सर्व प्रकारची मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले. राज्य उत्पादन शुल्क विभाग, मुंबईचे आयुक्त यांनी दिलेल्या निर्देशानुसार मनपा हद्दीपासून २५ कि.मी. आतील सर्व प्रकारची मद्यविक्री बंद  ठेवण्याचे निर्देश  दिले आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने मुंबई दारूबंदी कायद्यान्वये जिल्हाधिकारी रेखावार यांनी हे आदेश दिले आहेत. संबंधित दुकानदारांनी वरील कालावधीत मद्य दुकाने (अनुज्ञप्ती) उघडी ठेवू नयेत. तसेच विक्री व अन्य व्यवहार करू नयेत. बंदच्या दिवशी दुकाने उघडी आढळल्यास त्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला  आहे. जमावबंदी आदेशमहानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ९ रोजी मतदान तर १० रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) मनाई आदेश  लागू राहतील. निवडणुकीतील मतदानासाठी ९ रोजी सकाळी ७ वाजेपासून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत किंवा निवडणूक मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रत्येक मतदान केंद्र, मतदान बूथ व १० रोजी मतमोजणी ठिकाण शासकीय धान्य गोदाम, केंद्रीय विद्यालयाजवळ, नगाव बारी देवपूर येथील १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू करण्याबाबत कळविले. त्यानुसार उपविभागीय दंडाधिकारी मिसाळ यांनी मनाईचा आदेश लागू केला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे