शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपद राहणार ४ महिने रिक्त;  विधानसभेतील पदाचा निर्णयही प्रलंबित
2
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
3
ओलाचा बैल केला, शेतीला जुंपला! ईलेक्ट्रीक स्कूटरने ३० एकर शेत नांगरले; शेतकरी म्हणाले...
4
OYO कांड! विवाहित प्रेयसीसोबत पकडले, प्रियकराने विवस्त्रावस्थेतच हायवेवरून धूम ठोकली... 
5
लिव्ह इनमधील २४ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू; सैयारा सिनेमा पाहून काय घडले? पोलीस हैराण 
6
ना स्टॅाक ना SIP.., रिटर्नसाठी PPF सर्वांचा बॅास; केवळ १ लाखातून बनेल १ कोटींचा फंड
7
Crime News : धक्कादायक! रात्री उशिरा गावात गोळीबारचा आवाज झाला, जमिनीच्या वादातून दोन भावांना गोळ्या घातल्या
8
Stock Market Today: शेअर बाजारात मोठी घसरण, ३०० अंकांपेक्षा जास्त घसरण; Nifty २५००० च्या खाली, NBFC Stocks आपटले
9
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' कामासाठी मिळणार ३० दिवस सुट्टी
10
पहिला श्रावणी शनिवार: अश्वत्थ मारुती व्रताचरण; कसे करावे पूजन? पाहा, व्रतकथा अन् महात्म्य
11
'सैयारा'चा अहान पांडे चेन स्मोकर होता? युट्यूबरने केली पोलखोल; म्हणाला, "वर्कशॉपवेळी तर..."
12
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
13
'मुरांबा'मध्ये एन्ट्री केलेल्या 'या' चिमुकलीने हिंदीतही केलंय काम, ओळखलंत का?
14
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
15
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
16
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
17
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
18
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
19
पोलिस मारहाण प्रकरणातून गोपाळ शेट्टी यांची मुक्तता; ठोस, विश्वासार्ह पुराव्यांचा अभाव : न्यायालय
20
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब

लायसन्सची मुदत संपली, अपॉईंटमेंट घेतलीय का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:24 IST

धुळे - अनलॉक झाल्यानंतर लायन्सन्सचे नूतनीकरण करण्यासाठी गर्दी वाढली आहे. मात्र लायसन्स नूतनीकरणासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगी घेतली ...

धुळे - अनलॉक झाल्यानंतर लायन्सन्सचे नूतनीकरण करण्यासाठी गर्दी वाढली आहे. मात्र लायसन्स नूतनीकरणासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगी घेतली असेल तरच नूतनीकरण केले जात आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वानाच घरी थांबायला भाग पाडले होते. आता निर्बंध उठवण्यात आल्याने मागील दोन महिन्यांपासून रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्याचप्रकारे अनेकांच्या वाहन लायसन्सची मुदत संपली आहे. पण ते लायसन्स नूतनीकरण करू शकले नव्हते. त्यासाठी आरटीओ कार्यालयात नागरिकांची गर्दी होत आहे. पण लायसन्सचे नूतनीकरण करण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक असून ऑनलाईन अर्ज करावा असे आवाहन आरटीओ कार्यालयाने केले आहे. कोरोना अजून पूर्णपणे संपलेला नाही यासाठी अशी खबरदारी घेण्यात येत आहे. गर्दी वाढली तर पुन्हा कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो. तसेच लर्निंग लायसन्स साठी आता आरटीओ कार्यालयात जायची गरज नाही. ते आता घरबसल्या मिळवता येणार आहे. ऑनलाईन परीक्षा होऊन लर्निंग लायसन्स मिळणार आहे.

अशी घ्या अपॉइंटमेंट -

लायसन्सची मुदत संपली असेल तर नूतनीकरण करण्यासाठी आता परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. कागदपत्रे अपलोड करावे लागतील व ज्यादिवशी बोलावले जाईल तेव्हा कार्यालयात जावे लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कार्यालयाकडून खबरदारी घेतली जात आहे.

लर्निंग घरी मिळणार -

लर्निंग लायसन्स आता घरबसल्या मिळणार आहे. त्यासाठी आरटीओ कार्यालयात जायची आवश्यकता नाही. घरीच ऑनलाईन परीक्षा देता येईल. परीक्षा पास झाल्यानंतर लायसन्स मिळणार आहे. कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीनेच अपलोड करावे लागणार आहेत. यापूर्वी ही परीक्षा आरटीओ कार्यालयात जाऊन द्यावी लागत होती.

दररोज ६० वाहनांची नोंदणी -

लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर दररोज ५० ते ६० वाहनांची नोंदणी होत असल्याची माहिती मिळाली. लॉकडाउनच्या काळात देखील कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून कार्यालयातील कामकाज सुरु होते. त्यामुळे निर्बंध हटवल्यानंतर कामाचा ताण वाढला नसल्याची माहिती मिळाली. सोबतच कुंदाने येथे वाहन प्रात्यक्षिक परीक्षाही सुरु झाली आहे.

प्रतिक्रिया

ऑनलाईन अर्ज करा -

लायसन्सच्या नूतनीकरणासाठी प्रथम ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे बंधनकारक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी थेट संपर्क टाळता यावा यासाठी हा निर्णय घेतला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. वाहन प्रात्यक्षिक परीक्षाही सुरु झाली आहे. तसेच दोन ते तीन दिवसानंतर लर्निंग लायसन्स घरबसल्या मिळणार आहे.

- राहुल कदम, सहा. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी