शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांना दिलासा, १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर
2
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
3
“नरेंद्र मोदी लटकता आत्मा, आमचे पवित्र आत्मे त्यांच्यासोबत जाणार नाही”; संजय राऊतांचा पलटवार
4
देशातील पहिला डिजिटल भिकारी राजूचे Heart Attack ने निधन, QR कोडद्वारे मागायचा भीक
5
काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'
6
"यूपीत इंडिया आघाडीचे वादळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", राहुल गांधींचा हल्लाबोल
7
'ज्या व्यक्तीचा...'; नरेंद्र मोदींच्या ऑफरवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
सलमान-अक्षयचे सिनेमे फ्लॉप का होताएत? श्रेयस तळपदेने दिलं उत्तर; म्हणाला, 'लोक थकले...'
9
“अरे बापरे! शरद पवारांचे अंतःकरण किती उदार आहे”; देवेंद्र फडणवीसांचा मिश्किल टोला
10
Slone Infosystems IPO Listing: ३ दिवसांमध्ये ७०० पटींपेक्षा अधिक सबस्क्रिप्शन, आता IPO नं पहिल्याच दिवशी केलं मालामाल 
11
Kanhaiya Kumar : कन्हैया कुमार यांच्याकडे संपत्ती किती? शिक्षण किती घेतलंय? जाणून घ्या...
12
Narendra Dabholkar Case: मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे, कळसकरला जन्मठेप
13
प्रज्वल रेवण्णा प्रकरणात नवा ट्विस्ट! एसआयटी महिलांना वेश्याव्यवसाय प्रकरणात अडकवण्याची धमकी देते? जेडीएसने दावा केला
14
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
15
‘...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही राहणार नाही’, भाजपाचं मणिशंकर अय्यर यांना प्रत्युत्तर   
16
“PM मोदींमुळे हिरे व्यापाराला चालना, जागतिक बाजारपेठेत भारताचे भवितव्य आशादायी”: पीयूष गोयल
17
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला: "हत्येच्या गुन्ह्याचे समर्थन चुकीचे, तपास अधिकाऱ्यांचा निष्काळपणा" न्यायालयाचे निरीक्षण
18
SSY Vs SIP: सुकन्या समृद्धी की एसआयपी, कोणती स्कीम तुमच्या मुलीसाठी जमवेल अधिक पैसा? जाणून घ्या
19
Fact Check: लोकसभा निवडणुकीत परदेशातून आलेल्या मुस्लिमांना आर्थिक मदत जाहीर करणारे पत्र बनावट
20
दलजीत कौरच्या भांगेत सिंदूर? दुसऱ्या पतीसोबतही घटस्फोट झाल्याची होती चर्चा

चलो बुलावा आया है !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:53 PM

सप्तश्रृंगी गड : जिल्ह्यातून हजारो भाविक रवाना

धुळे : जिल्ह्यासह शहरातील भाविक दरवर्षी मोठ्या उत्साहाने सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी गडावर पदयात्रेने मार्गस्थ होतात़ यंदाही गडावर जाणाºया भाविकांची अक्षरश: रिघ लागली आहे. शहरात ठिकठिकाणी भाविकांसाठी महाप्रसाद, पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे़सप्तश्रृंगी मातेच्या गडावर चैत्र यात्रोत्सवासाठी जिल्हाभरातील भाविक पदयात्रेने जाण्याची परंपरा आहे. यंदाही आठवडाभरापूर्वीपासून भाविक गडाच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत़ यंदाही मातेच्या गडावर ध्वज लावण्याची परंपरा शिरपूरच्या जय मातादी पदयात्रा समितीतर्फे कायम राखली जाणार आहे़ लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व भाविक रणरणत्या उन्हात शेकडो किलोमीटरचे आंतर पार करून चैत्र पौर्णिमेला गडावर पोहचतात़ रस्त्यात डिजे, ढोलताशे, पारंपारिक वाद्यांच्या गजरात नृत्य करीत, हातात भगवे झेंडे घेऊन भाविक वाटचाल करतात़ उन्हाची पर्वा न करता भक्तीभावात तल्लीन होऊन वाटचाल करणाºया या भाविकांसाठी ठिकठिकाणी भाजी भाकरी, मसालेभात, उसळ, पोहे यासह विविध पदार्थ व थंडपाणी, सरबत, उसाच्या रसाची व्यवस्था केली जाते़  पदयात्रा केल्यामुळे सर्व इच्छा पूर्ण होत असल्याची श्रध्दा असल्याने तरूणांसह महिला, वृध्द, लहान मुले देखील मोठ्या उत्साहाने या पदयात्रेत सहभागी होऊन सप्तश्रृंगी देवीच्या चरणी नतमस्तक होतात़ त्याठिकाणी मोठा यात्रोत्सवही असतो़ निजामपूर येथून भाविक रवानानिजामपूर येथून सलग १९ व्या वर्षी २०० तरुण श्री सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी सोमवारी सकाळी पायी दिंडीने निघाले. १५ एप्रिल रोजी सकाळी मारोती मंदिरावर भाविक तरुण जमले होते. बजरंगबलीचे दर्शन घेऊन वाजत-गाजत पायी दिंडी मार्गस्थ झाली.  येथील जयश्रीराम गणेश मंडळ, आई तुळजा भवानी मंडळ, भोई मित्र मंडळ, एकलव्य मित्र मंडळाचे सुमारे २०० तरुण या पायी दिंडीत सहभागी झाले आहेत. १५ रोजी कासारे, पिसोळबारी मार्गे सोमपूर मुक्काम व तेथून सटाणा, विठेवाडीहुन १७ रोजी सप्तशृंगी गडावर भाविक पोहोचतील, अशी माहिती भैय्या गुरव यांनी दिली. गणेश बेंद्रे, ज्ञानेश्वर गुरव, उद्धव मराठे, मनोज मोरे, मुकेश राणे, प्रशांत मोरे आदींचा यात प्रमुख सहभाग आहे़वर्षी फाट्यावर अल्पोपहारसप्तश्रृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी जाणाºया भाविकांसाठी शिंदखेडा तालुक्यातील वर्षी फाट्यावर अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती़ दरवर्षी मध्यप्रदेश, शिरपूर, बोराडी परिसरातून भाविक मोठ्या संख्येने पदयात्रेने गडावर दाखल होतात़ पदयात्रेत भरवाडे येथील ३ फुट उंचीचे झामरू कोळी सहभागी झाले आहेत. ते आपल्या दोन लहान भावांसह सलग पाच वर्षापासून या पदयात्रेत सहभाग घेत आहेत. 

टॅग्स :Dhuleधुळे