शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या दिशेने एकजरी टॉमहॉक मिसाईल आले...; दोन तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यावर पुतीन भडकले
2
भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
3
'ऑपरेशन सिंदूर'चा व्हिडीओ दाखवून पाकिस्तान करतंय महिलांचा ब्रेनवॉश! दहशतवाद्यांचा भरतोय वर्ग
4
पैसे दुप्पट करणारी जबरदस्त स्कीम; सरकारची मिळते गॅरेंटी, 'इतक्या' महिन्यांत डबल होईल रक्कम
5
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
6
ओला-उबरचा बाजार उठणार...! महाराष्ट्रासह 'या' राज्यांत सरकारी 'भारत टॅक्सी' येणार, १०० टक्के भाडे...
7
कुर्ला, सांगली ते दुबई...मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई, D-गँगच्या ड्रग्स मास्टरमाइंडला UAE तून खेचून आणले
8
नियतीचा क्रूर खेळ! ६ बहिणींच्या कुटुंबात एकुलता एक मुलगा, भाऊबीजच्या दिवशीच झाला मृत्यू; ऐकून डोळ्यांत पाणी येईल
9
आजचे राशीभविष्य २४ ऑक्टोबर २०२५ : आर्थिक लाभ, खोळंबलेली कामे...
10
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
11
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
12
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
13
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
14
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
15
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
16
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
17
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
18
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
19
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
20
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय

प्रत्येक तालुक्यात १०० पेक्षा कमी अ‍ॅक्टीव रूग्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 11:57 IST

धुळे शहरातील २९९ बाधितांवर उपचार सुरू

धुळे - जिल्ह्यातील अ‍ॅक्टीव रूग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे दिलासा मिळाला आहे. बाधित रूग्णांची संख्या १ हजाराच्या खाली आली आहे. विशेष म्हणजे चारही तालुक्यात अ‍ॅक्टीव रूग्णांची संख्या शंभर पेक्षा कमी झाली आहे. मागील काही दिवसांत धुळे शहरातील रूग्णसंख्या देखील नियंत्रणात आली आहे. नव्या बाधीत रूग्णांमध्ये शहरातील रूग्णांचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे शहरातील अ‍ॅक्टीव रूग्णांची संख्या देखील ५०० च्या खाली आली असून सद्या  २९९ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. असे बदलत राहिले हॉटस्पॉट - कोरोनाचा जगभर हाहाकार सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी भारतातही या भयंकर विषाणूने हातपाय पसरले. १० एप्रिल रोजी जिल्ह्यातही कोरोनाचा शिरकाव झाला. साक्री येथील रूग्णाचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.  जून महिन्यापर्यंत बाधीत रूग्णांची संख्या नियंत्रणात होती. त्यानंतर मात्र रूग्णसंख्येत वाढ होत गेली. धुळे शहर जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला हॉटस्पॉट ठरला होता. धुळे शहरातील रूग्णांचे प्रमाण आजही इतर तालुक्यांच्या तुलनेत अधिक आहे. जिल्ह्यातील कोरोनाचे हॉटस्पॉट बदललत राहिले. जुलै महिन्यात शिरपूर तालुक्यातील रूग्णांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढली होती. आॅगस्ट माहिन्यात शिरपूर सोबतच शिंदखेडा तालुक्यात रूग्ण आढळू लागले. त्यानंतर साक्री तालुक्यातील रूग्णांची संख्या वाढली होती. प्रत्येक तालुका विशिष्ट काळापुरता कोरोनाचा हॉटस्पॉट झाला होता. आता मात्र इतर तालुक्यांप्रमाणेच साक्री तालुक्यातील बाधीत रूग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. धुळे शहरात २९९ अ‍ॅक्टीव रूग्ण - धुळे शहरातील २९९ रूग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. शहरातील ५ हजार ८९९ रूग्णांना आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी ५ हजार ४३८ रूग्ण बरे झाले आहेत तर  १६२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. धुळे तालुक्यातील अ‍ॅक्टीव रूग्णांची संख्या कमी झाली आहे मात्र  रूग्णसंख्येच्या प्रमाणातील मृतांचे प्रमाण  चिंताजनक आहे. तालुक्यातील १ हजार ५०२ रूग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे त्यापैकी १ हजार ३४९  रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. सद्या ८७ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. शिरपूर तालुक्यात सर्वात कमी अ?क्टीव रूग्ण - शिरपूर तालुक्यात सर्वात कमी अ‍ॅक्टीव रूग्ण आहेत. तालुक्यातील उपचार घेत असलेल्या बाधीत रूग्णांची संख्या ६९ इतकी आहे. तालुक्यातील अनेक गावात कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यात थाळनेर, वाडी, शिंगावे आदि प्रमुख गावांचा समावेश होता. तालुक्यातील २ हजार ४४८ बाधीत रूग्णांपैकी २ हजार ३१४ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच ६५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. साक्री तालुक्यात ९० अ‍ॅक्टीव रूग्ण - साक्री तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेला जिल्ह्यातील शेवटचा तालुका होता. आता साक्री तालुक्यातील रूग्णसंख्या देखील शंभर पेक्षा कमी झाली आहे. साक्री तालुक्यातील ९० व शिंदखेडा तालुक्यातील ७२ रूग्णांवर सद्या उपचार सुरू आहेत. ग्राफसाठीएकूण अ‍ॅक्टीव रूग्ण -६१७ तालुकानिहाय अ‍ॅक्टीव रूग्ण - धुळे शहर - २९९धुळे तालुका -८७शिंदखेडा - ७२शिरपूर - ६९ साक्री - ९०