शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
3
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
4
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
5
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
6
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
7
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
8
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
9
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
10
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
11
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
12
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
13
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
14
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
15
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
16
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
17
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
18
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
19
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
20
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला

पक्षप्रवेशासाठी आता नेत्यांना ‘फिल्टर पॉलिसी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 13:10 IST

मुख्यमंत्री : धुळे येथे पत्रपरिषदेतील माहिती 

धुळे : भाजपत इतर पक्षांमधून मोठ्या संख्येने नेते, कार्यकर्ते दाखल झाले आहेत. कार्यकर्त्यांसाठी अद्याप प्रवेशासाठी मोकळीक आहे; परंतु आता नेते जास्त व आमच्या जागा कमी आहेत. त्यामुळे नेत्यांसाठी आता ‘फिल्टर पॉलिसी’ अवलंबली जाणार असून स्कॅनिंगनंतरच यापुढे त्यांना प्रवेश दिला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे दिली. महाजनादेश यात्रेच्या दुसºया टप्प्यास गुरूवारी धुळे येथून सुरूवात झाली. पहिल्या दिवशी धुळ्यात रोड शो, संध्याकाळी दोंडाईचा तर रात्री नंदुरबार येथे जाहीर सभा घेऊन मुख्यमंत्री येथे मुक्कामी होते. दुसºया दिवशी शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्र्यांनी  पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. महाजनादेश यात्रेच्या पहिल्या टप्प्यात १० जिल्हे झाले. त्याचवेळीराज्यात भीषण पूरस्थिती निर्माण झाल्याने यात्रा स्थगित केली. मात्र पूरस्थिती निवळली असून यात्रेचा दुसरा टप्पा धुळ्यातून सुरू केला. आतापर्यंत जवळपास ४३ मतदारसंघात पोहचलो असून या टप्प्यात उत्तर महाराष्टÑ, मराठवाडा व विदर्भातील राहिलेला एक जिल्हा करून सोलापूरला दुसरा टप्पा संपेल.  तर तिसरा व अंतिम टप्पा १३ ते १९ सप्टेंबर या कालावधीत प.महाराष्टÑ ते कोकण (उर्वरीत भाग) असा राहील, असे ते म्हणाले. आमच्यासोबत इतर पक्षांमध्येही यात्रेचा उत्साह संचारला असून त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असे ते उपरोधाने म्हणाले. यात्रेची परंपरा भाजपची असून विरोधात असताना संघर्षाची तर सत्तेत असताना संवादाची ही यात्रा आहे. जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. समस्या व अपेक्षाही असून त्या हे सरकारच पूर्ण करू शकते, असा विश्वास असल्यानेच यात्रेला हा प्रतिसाद मिळत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे जबाबदारीही वाढली असून पुन्हा  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार आणून गेल्या पाच वर्षांपेक्षा जास्त काम करू, असे त्यांनी सांगितले. यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तेथे काय केले हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. आम्ही सत्तेवर येण्याआधी इतर राज्ये विकासात पुढ होती. मात्र युती शासन आल्यानंतर आज कोणत्याही क्षेत्रात राज्याचा पहिल्या तीनमध्ये क्रमांक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. धुळ्यासह खान्देशातील प्रकल्पांना चालना दिली असून योग्य वेळेत ते पूर्ण होतील. त्यामुळे दुष्काळ व सिंंचनाच्या समस्या दूर होतील. त्यात त्यांनी धुळ्यासाठी अक्कलपाडा पाणी योजना, सुलवाडे-जामफळ योजना व मेगा रिचार्ज प्रकल्पाचा उल्लेख केला. कनेक्टिव्हीटीअभावी धुळे जिल्ह्याचा विकास व प्रगती थांबलेली होती, तिला मनमाड-इंदूर रेल्वे  मार्गामुळे कनेक्टिव्हीटी मिळणार असून प्रगतीला चालना मिळेल, असा आशावादही  मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. धुळे महापालिकेला येत्या १५ दिवसांत चांगले व ‘टिकावू’ आयुक्त मिळतील, तसेच महापुरामुळे अतिक्रमण व अवरोधांचे आॅडिट करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी अन्य प्रश्नांच्या उत्तरात सांगितले.  जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खासदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ.सुभाष भामरे, महापौर चंद्रकांत सोनार, जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल, सुजितसिंग ठाकूर आदी यावेळी  उपस्थित होते. +

टॅग्स :Dhuleधुळे