शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

धुळे महापालिकेत विरोधी पक्षनेत्या वैशाली लहामगेंनी स्विकारला पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 16:22 IST

बबन थोरात : पत्रकबाजी नको, विकास हवा!

ठळक मुद्देधुळे महापालिकेत झाला कार्यक्रमपहिल्यांदाच महिलेला मिळाला मानसर्वपक्षीय नेत्यांकडून देण्यात आल्या शुभेच्छा

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरात काही लोकप्रतिनिधी केवळ पत्रकबाजी करीत असून ही पध्दत धुळयातच आहे़ मात्र धुळेकर जनतेला पत्रकबाजी नको तर विकास हवा असून शिवसेना त्यासाठी कटिबध्द आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबन थोरात यांनी केले़मनपाच्या विरोधी पक्षनेते पदी वैशाली लहामगे यांची निवड झाली़ लहामगे यांनी मंगळवारी पदभार स्विकारला़ सदर कार्यक्रमात थोरात बोलत होते़ या कार्यक्रमाला महापौर कल्पना महाले, आयुक्त सुधाकर देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, महानगरप्रमुख सतिश महाले, संजय गुजराथी, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे, स्थायी समिती सभापती कैलास चौधरी, महिला बालकल्याण सभापती इंदुमती वाघ, माजी महापौर जयश्री अहिरराव, भुपेंद्र लहामगे, अतुल सोनवणे, प्रा़ शरद पाटील, महेश मिस्तरी, एम़जी़धिवरे, वाल्मिक दामोदर, साबीर शेख, प्रशांत श्रीखंडे उपस्थित होते़ धुळे मनपात महिलाराज आणण्यासाठी शिवसेनेचे विरोधी पक्षनेतेपदी वैशाली लहामगे यांची निवड करून पहिला मान दिला असल्याचे बबन थोरात म्हणाले़ महापौर कल्पना महाले यांनी वैशाली लहामगे यांना विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र दिले़ तसेच शहराच्या विकासात त्या योगदान देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली़ माजी महापौर जयश्री अहिरराव  यांनी मनपात महिलाराज आणण्याचे आवाहन केले़ मनोज मोरे यांनीही त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला़ लहामगे यांनी पदभार स्विकारल्यानंतर त्यांना सर्वपक्षीय नेत्यांनी शुभेच्छा दिल्या़