शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाळू ठेकेदार-ग्रामस्थांमध्ये वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2017 00:22 IST

तापीच्या खड्ड्यात तरुण बेपत्ता : शोध सुरू, संतप्त नातेवाइकांकडून तोडफोड

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील अक्कडसे येथील  १९ वर्षीय  तरुण तापी नदीपात्रातील वाळू उपशाच्या खड्ड्यात पडून बेपत्ता झाल्याची घटना घडली़ या घटनेनंतर ग्रामस्थ व वाळू ठेकेदार गोरख पाटील यांच्यात वाद झाला़ याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़सतीश छोटू सैंदाणे (१९) हा तरुण रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास उप्परपिंड येथे चावदसनिमित्त कुळदेवता असलेल्या मनुदेवी मंदिरात दर्शनासाठी तापी नदीपात्रातून जात होता़ त्या वेळी बेसुमार वाळू उपशामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे त्याला पाण्याचा अंदाज आला नाही व खड्ड्यात पडल्याने बेपत्ता झाला़ याबाबत सतीशच्या घरी माहिती देण्यात आल्यानंतर त्याचे कुटुंबीय व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली़ कुटुंबीयांना त्याची चप्पल पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले़ वाळू उपशामुळे पडलेल्या खड्ड्यात तो पडल्याने संतप्त ग्रामस्थांनी थेट नदी पलीकडे असलेल्या उप्परपिंड येथील वाळू ठिय्यांवर हल्ला करून साहित्याची तोडफोड केली़ त्यामुळे तणाव निर्माण झाला होता़ वाळू ठिय्यांवरील ५ ते ६ जण ग्रामस्थांवर धावून गेले़ ठेकेदाराने तलवार काढली़ यामुळे तणाव आणखी वाढला़ या घटनेची माहिती मिळताच शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्ता  पवार, सहायक पोलीस निरीक्षक ए़ए़पटेल यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले़ पोलिसांनी मध्यस्थी करीत वाद मिटवला व तलवार जप्त केली़ तसेच गोरख पाटील नामक वाळू ठेकेदारावर कारवाईचे आश्वासन दिले़ या वेळी संपूर्ण गाव नदीपात्रात गोळा झाले होते़ सतीश हा आईवडिलांचा एकुलता  मुलगा असून त्याला दोन बहिणी आहेत़ त्याचे वडील दोंडाईचा येथील न्यायालयात खासगी लिपिक म्हणून काम करतात़ दरम्यान, या घटनेनंतर सतीशच्या मोबाइलचे लोकेशन खड्ड्याजवळ असल्याचे दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले़ पोलीस रात्री उशिरापर्यंत ठाण मांडूनरात्री उशिरापर्यन्त संदीपला शोधण्याचे कार्य सुरू होते. घटनास्थळी अक्कडसे  ग्रामस्थ, शिंदखेडा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक वसंत सोनोने, पीएसआय स्वप्नील राजपूत, योगीराज जाधव, प्रकाश पोतदार  हे ठाण मांडून होते. यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.