धुळे : मालेगावर रोडवरील पवन नगर हुडको परिसरात बुधवारी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली़ यावेळी येथील महापालिकेच्या भुखंडातील काटेरी झाडे-झुडूपे काढून सदरील जागा नागरिकांना क्रिकेट मैदानासाठी उपलब्ध करून देण्यात आली़महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजित शेख यांच्या निर्देशानुसार सभापती युवराज पाटील, उपमहापौर कल्याणी अंपळकर, सहाय्यक आयुक्त शांताराम गोसावी, सहायक आरोग्य अधिकारी लक्ष्मण पाटील, प्रभारी स्वच्छता निरीक्षक शुभम केदार यांनी सकाळी आठ वाजता पहाणी केली़ यावेळी पवन नगर परिसरात दूध डेअरीवर प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या़ तसेच घंटागाडीमध्ये कचरा संकलन करताना ओला व सुका कचरा वेगवेगळ्या टाकण्याबाबत प्रात्यक्षिक तसेच नागरिकांना कचरा उघड्यावर टाकण्याऐवजी घंटागाडीत टाकावा, कचऱ्याचे वर्गीकरण करून दोन कंपार्टमेंटमध्ये स्वतंत्र टाकण्याचे आवाहन केले़़यावेळी पवन नगर शेजारील रिकाम्या भूखंडातील काटेरी झुडुपे काढण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला़ सदर ठिकाणी खेळाचे मैदान विकसित करण्याबाबत एक महिन्यात नियोजन केले जाणार आहे़ या खुल्या जागेवर क्रिकेटच्या मैदानी स्पर्धा भरविण्यात येणार आहे़
पवन नगरात स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 23:06 IST