शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा येथील लाचखोर ग्रामसेवक जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 10:56 IST

टक्केवारीतून लाच : सरपंचासह मुलाविरुद्धही गुन्हा

ठळक मुद्दे याप्रकरणी सायंकाळी ग्रामसेवकाला अटक करण्यात आली आहे. तर सरपंच व त्याच्या मुलाला अटक करण्यात आलेली नाही.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी केली़

लोकमत न्यूज नेटवर्क

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा येथील ग्रामसेवक प्रवीण जाधव याने ठेकेदाराच्या रस्ता कामातून टक्केवारीच्या हिशोबाने परस्पर पाच हजार रुपये कापून घेतले़ याप्रकरणी ठेकेदाराने दिलेल्या तक्रारीवरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ग्रामसेवकासह महिला सरपंच आणि त्यांच्या मुलाविरुध्द गुन्हा दाखल केला़ यात ग्रामसेवकाला मंगळवारी अटक केली आहे़   शिंंदखेडा तालुक्यातील वालखेडा येथील  २ लाख ९८ हजार ९६९ रुपयांचे रस्ता काँक्रेटीकरणाचे काम एका ठेकेदाराने घेतले होते़ कामातून पाच टक्केप्रमाणे  रकमेची मागणी  ग्रामसेवक आणि महिला सरपंच व त्याच्या मुलाने ६ सप्टेंबर रोजी ठेकेदाराकडे केली होती़ लाचेची मागणी १५ हजार आणि ५ हजार रुपये अशी करण्यात आली होती़ शेवटी तडजोडीअंती पाच हजार रुपये देण्याचे ठरले आणि ही  ग्रामसेवकाने रक्कम परस्पर कापून घेतली़ हा प्रकार उजेडात आल्याबरोबर ठेकेदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्या तक्रारीची चौकशी केल्यानंतर  ग्रामसेवक प्रविण जाधव यांच्यासह  वालखेड्याच्या सरपंच केवळबाई ठाकरे आणि त्यांचा मुलगा डॉ़ कैलास ठाकरे यांच्याविरुध्द धुळे शहर पोलीस स्टेशनला मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.