लाेखंडी पादचारी पुलासाठी प्रयत्न करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:36 AM2021-03-26T04:36:04+5:302021-03-26T04:36:04+5:30

शहरातील वाहतूक कोंडी तसेच कायमस्वरूपी होणारी वर्दळीमुळे नागरिकांसह विद्यार्थांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत. ...

Lakhandi will strive for a pedestrian bridge | लाेखंडी पादचारी पुलासाठी प्रयत्न करणार

लाेखंडी पादचारी पुलासाठी प्रयत्न करणार

Next

शहरातील वाहतूक कोंडी तसेच कायमस्वरूपी होणारी वर्दळीमुळे नागरिकांसह विद्यार्थांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत. शहरातील पारोळा चौफुली प्रकाश टाॅकीज परिसरात शाळा व मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल असल्याने वाहतूक कोंडी होते. या दोन्ही भागात मुंबई शहरात जसे लोखंडी पादचारी पूल बनविण्यात आलेले आहे. तसेच या ठिकाणी बनविण्यात येणार आहे. त्यासाठी आमदार फारूक शाह यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, शहर वाहतूक विभागाच्या अधिकारी तसेच मनपाच्या अधिकाऱ्यांसोबत या भागात पाहणी करून पादचारी पुलांचे अंदाजपत्रक बनवून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. यावेळी आमदार फारूक शाह यांच्या सोबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एजाज शाह, मनपाचे अभियंता कैलास शिंदे, मनपा विद्युत विभागाचे अभियंता एन. के. बागुल, वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक संगीता राऊत, निलेश काटे, आसिफ शाह उपस्थित होते.

Web Title: Lakhandi will strive for a pedestrian bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.