शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कोळी समाज ५५१ वधूवरांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 21:39 IST

डिसेंबरमध्ये परिचय मेळावा : समाजात चालीरीती बाजूला ठेवून विवाह

लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : कोळी समाजाचा वधूवर परिचय मेळावा समितीच्या प्रयत्नाने हुंडा न घेता, समाजातील जुन्या चालीरीतींना फाटा देत, मानपान टाळून आदर्श विवाह होत आहे. हे कोळी समाज वधुवर पालक मेळाव्याचे फलित असल्याचे बोलले जात आहे. २३ डिसेंबर रोजी सामुहिक परिचय मेळावा होत असून यासाठी ५५१ वधुवरांची यात नोंदणी झाली आहे.कोळी समाजातील लग्नकार्यात होणारा वारेमाप खर्च, मानपान, अनावश्यक  चालीरीती यांना पायबंद बसावा म्हणून  दोंडाईचा कोळी समाजाच्यावतीने २३ डिसेंबर रोजी कोळी समाज सामूहिक वधु वर परिचय मेळाव्याचे  आयोजन करण्यात आले आहे . आजतागायत   वधु- वर परिचय मेळाव्यात  ५५१  वधु वरानी  नोंदणी केल्याची माहिती  वधुवर परिचय मेळावा समिती अध्यक्ष मनोज निकम व उपाध्यक्ष जयेंद्र सूर्यवंशी यांनी दिली.या समितीच्या  प्रयत्नातून धुळे येथील दिनेश मुरार निकम यांचा  मुलगा व अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे सरचिटणीस रमेश निकम यांचा पुतण्या  चि.पियुष व  शहादा तालुक्यातील  जावदा येथील  सुरेश बाजीराव शिरसाठ यांची कन्या कु.पुनम यांची विवाह बैठक नुकतीच झाली. हा विवाह हुंडा न घेता, मानपान  व अनावश्यक चालीरीती झुगारुन होत आहे. विवाहात नवरदेव व नवरीचे कपडे (बस्ता) वरवधु पित्याने स्वत: घ्यावेत. सौंदर्य प्रसाधने स्वखर्चाने करावेत, जेवणावळ, मंडप, बँड व इतर बाबींचा खर्च वरपित्याने करावा. मानपानासाठी नारळ किंवा खोबरेवाटी  देऊ नये. अशी आदर्श बोली बंधने बैठकीत संमत झालीत. सदर आदर्श विवाह मेळावा  समितीने घडवून आणला आहे, अशी माहिती मनोज निकम व जयेंद्र सूर्यवंशी यांनी दिली.या निमित्ताने वरवधू पित्यांचा  सत्कार टोकरे कोळी समाज व वधुवर मेळावा समितीच्यावतीने समाज जिल्हाध्यक्ष प्रदीप नवसारे, रमेश निकम, समितीचे अध्यक्ष मनोज निकम, जयेंद्र सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला. आदर्श विवाह होत असल्याने समिती अध्यक्ष मनोज निकम, कोळी  समाज जिल्हाध्यक्ष प्रदिप नवसारे,  रमेश निकम, सुरेश कुवर, बाबुराव शिरसाठ, काशिनाथ चित्ते, सुकदेव चित्ते, गणेश निकम, आदिंनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :Dhuleधुळे