लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिका निवडणूकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या मतदार यादी कार्यक्रमानुसार मंगळवारी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आल्या़ महापालिका निवडणूकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने १५ आॅक्टोबरला मतदार यादी कार्यक्रम जाहीर केला होता़ त्यानुसार २५ आॅक्टोबरला प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांची प्रसिध्दी करण्यात आली व ३१ आॅक्टोबरपर्यंत हरकती मागविण्यात आल्या होत्या़ विहीत मुदतीत प्रारूप मतदार यादीवर हरकती दाखल झाल्या़ त्यानंतर प्रशासनाकडून हरकतींचा निपटारा करण्यासाठी पर्यवेक्षकीय अधिकारी व कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली़ त्यानंतर हरकतींचा निपटारा करण्याचे काम दिवसरात्र सुरू होते़ मतदार यादी कार्यक्रमानुसार मंगळवारी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या महापालिकेच्या जुन्या इमारतीच्या सभागृहात प्रसिध्द करण्यात आल्या़ यावेळी आयुक्त सुधाकर देशमुख, उपायुक्त रविंद्र जाधव, सहायक आयुक्त शांताराम गोसावी, सहायक आयुक्त नारायण सोनार, बळवंत रनाळकर, मनोज वाघ, युवराज वाघ, प्रदीप चव्हाण यांच्यासह सर्व वसुली निरीक्षक व कर्मचारी उपस्थित होते़
धुळ्यात अंतिम मतदार याद्या प्रसिध्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 19:32 IST
मनपा निवडणूक : एक खिडकी योजनेचे कार्यालय सुरू, प्रमाणपत्रांचे वितरण
धुळ्यात अंतिम मतदार याद्या प्रसिध्द
ठळक मुद्देप्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिध्द आयुक्तांसह विविध अधिकाºयांची होती उपस्थिती