महावीर काॅलनी, सुंदरच काॅलनी, विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या मागील काॅलन्या, अग्रसेन शाळेचा परिसर, तसेच महिंदळे शिवारातील काॅलनी परिसर अंधारात आहे.
मंगळवारी सायंकाळी पाच वाजेनंतर विद्युत पुरवठा सुरळीत झाला; परंतु रात्री उशिरापर्यंत विजेचा लपंडाव सुरूच होता. त्यामुळे रहिवाशांना चोवीस तासांनंतरही दिलासा मिळालेला नाही. संपूर्ण रात्र रहिवाशांनी अंधारात काढली. उकाडा वाढल्याने लहान मुलांचे हाल होत आहेत. या भागात वीज बिल वसुली १०० टक्के आहे. असे असताना वीज पुरवठ्याच्या बाबतीत महावितरणचा कारभार बेभरवशाचा आहे. दररोज वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. त्यामुळे या भागातील रहिवाशी तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
दरम्यान, याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क होऊ शकला नाही; परंतु सोमवारी सायंकाळी पाऊस सुरू झाल्यानंतर ट्रान्सफाॅर्मवर मोठा बिघाड झाल्याचे सांगण्यात आले; परंतु चोवीस तासात दुरुस्ती झालेली नाही.