शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत रंगली जुगलबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 12:16 IST

शोभायात्रेला चढला राजकीय रंग : पहिल्यांदा समितीचे दोन व्यासपीठ, एकावर भाजपा तर दुसऱ्यावर काँग्रेस, राष्टÑवादी, शिवसेनेचे पदाधिकारी

धुळे : दरवर्षी गुढी पाडव्याला हिंदू नववर्षानिमित्त शहरातून काढण्यात येणाऱ्या सर्वपक्षीय नववर्ष स्वागत शोभायात्रेला यंदा लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय रंग चढला. शनिवारी सायंकाळी महात्मा गांधी चौकात सर्वपक्षीय समितीचे दोन व्यासपीठ उभारण्यात आले होते. एकावर भाजप उमेदवारासोबत भाजपाचे व सर्वपक्षीय समितीचे काही पदाधिकारी तर दुसºयावर काँग्रेस उमेदवारासोबत राष्टÑवादी, शिवसेना आणि सर्वपक्षीय समितीचे रवी बेलपाठक यांच्यासह अन्य काही पदाधिकारी उपस्थित होते.शहरातील महात्मा गांधी चौकातील नारायण बुवा समाधीपासून शोभायात्रेला सुरुवात होणार असल्याने सर्वपक्षीय समितीतर्फे नेहमीप्रमाणे नारायण बुवा समाधीला लागून व्यासपीठ उभारण्यात आलेले होते. तर समितीच्या काही सदस्यांनी भाजपाने रस्त्याच्या दुसºया बाजुला जुन्या धुळेकडे जाणाºया रस्त्यावर दुसरे व्यासपीठ उभारण्यात आले होते.सुरुवातीला सर्वपक्षीय समितीच्या पहिल्या व्यासपीठावर कार्यक्रमाला सुरुवात झाली. याठिकाणी समितीचे पदाधिकारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रवी बेलपाठक, काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील, राष्टÑवादीचे राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार प्रा.शरद पाटील, शिवसेनेचे अतुल सोनवणे, युवराज करनकाळ, नारायणबुवा समाधीचे मठाधिपती भाऊ रुद्र, महंत साळकर बाबाजी, ह.भ.प.धनंजय महाराज, पू.निलेश महाराज व्यासपीठावर उपस्थित होते. व्यासपीठावरील महंत साळकर बाबाजी यांच्यासह मान्यवरांनी मार्गदर्शन सुरु असतांना समोरील व्यासपीठावरील माईकवरुन मोठ्या आवाजात गाणे सुरु होते. कार्यक्रम संपल्यावर मान्यवर व्यासपीठावरुन खाली आले. त्यावेळी शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष महेश मिस्तरी त्याठिकाणी आले. त्यांनी आमदार कुणाल पाटील यांच्या हातात भगवा ध्वज दिला. त्यानंतर शोभायात्रा सुरु झाली.शोभायात्रा थोडी पुढे गेल्यानंतर समितीच्या दुसºया व्यासपीठावर भाजपाचे उमेदवार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, महापौर चंद्रकांत सोनार, सर्वपक्षीय समितीचे पदाधिकारी विनोद मोराणकर, स्वागताध्यक्ष देवेंद्र सोनार, माजी महापौर जयश्री अहिरराव, हिरामण गवळी, १०००८ महामंडलेश्वर वैश्वनाथ महाराज, डॉ.माधुरी बाफना, भिकन वराडे आदी उपस्थित होते. दिप प्रज्वलन केल्यानंतर शोभायात्रेला सुरुवात झाली. यावेळी आधी त्या व्यासपीठावर असलेले माजी आमदार प्रा.शरद पाटील आणि अतुल सोनवणे हे भाजपा पदाधिकाºयासोबत सहभागी झाले.एकच शोभायात्रा दोन गटात मागे - पुढे निघाली.रात्री उशीरापर्यंत शोभायात्रा सुरु होती. शोभायात्रेत रात्री आठ वाजेपर्यत आमदार कुणाल पाटील हे सहभागी होते.एकविरादेवी पालखी सरळ दुसºया व्यासपीठाकडेसालाबादाप्रमाणे शोभायात्रेत आई एकविरा देवी यांची पालखीही निघाली. पालखी जेव्हा देवपुरातून महात्मा गांधी चौकात आली तर ती पहिल्यांदा सर्वपक्षीय समितीच्या व्यासपीठाकडे जात असतांना तिला परस्पर रस्त्याच्या दुसºया बाजुला असलेल्या व्यासपीठाकडे नेण्यात आले. एकूणच चौकात रंगलेली राजकीय जुगलबंदीच्यावेळी त्याठिकाणी उपस्थित दोन बाजुच्या तरुण वर्गाने घोषणाबाजी केली. मात्र जे ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. त्यांनी याठिकाणी राजकारण नको, असे म्हणत याबाबत खंत व्यक्त केली.

टॅग्स :Dhuleधुळे