धुळे : एसटीचा आमुलाग्र बदल प्रवाशांना कळावा व प्रवाशी सेवेचे अंतरग उलगडून दाखविण्यासाठी ‘वारी लालपरीची’ हे फिरते प्रदर्शन २ आॅगस्ट रोजी धुळेकरांना बघावयास मिळणार आहे. धुळे आगारात सकाळी १० ते सायंकाळी ६ या दरम्यान हे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे.महाराष्टÑ राज्य मार्ग परिवहन महामंडळ व बस फॉर अस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून प्रदर्शनाचा चित्ररथ तयार करण्यात आले आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यात हे प्रदर्शन भरविण्यात येत असून, प्रदर्शनाचा सातवा टप्पा धुळे विभागात दाखल होत आहे. एस.टी.चा आतापर्यंतचा प्रवास व त्यानंतर झालेले बदल याची संपूर्ण माहिती या प्रदर्शनातून मिळणार आहे. त्यात ७० वर्षांतील प्रवास, विविध योजना याची माहिती देण्यात येणार आहे. या प्रदर्शनास शहर व परिसरातील नागरिकांनी भेट द्यावी असे आवाहन धुळे विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी केले आहे.
लालपरीचा प्रवास उलगडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 21:29 IST