शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
4
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
5
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
6
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
7
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
8
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
9
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
10
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
11
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण
12
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
13
वाद-प्रतिवाद सुरू असलेल्या भारताला आज स्वीकारमंत्र अंगीकारण्याची गरज -मोरारीबापू
14
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
15
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
16
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
17
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
18
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
19
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
20
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल

एसटी भरतीत दलालांकडुन उमेदवारांना नोकरीचे आमिष, धुळे विभागातील प्रकार

By सचिन देव | Updated: October 16, 2023 21:13 IST

आमिषांना बळी न पडण्याचे आ‌वाहन

सचिन देवधुळ‌े : एसटी महामंडळाच्या धुळे विभागातर्फे  अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी चालक - वाहक पदासाठी निःशुल्क प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिष्णां नंतर पात्र उमेदवारांना सेवेत सामावून घेण्यात येणार आहे. मात्र, या निःशुल्क प्रशिक्षणासाठी व त्या नंतर नोकरीसाठी सबंधित जमातीच्या उमेदवारांना काही बाहेरील दलाल मंडळी आर्थिक आमिष मागून एसटी महामंडळात नोकरीचे आमिष दाखवित असल्याच्या तक्रारी विभाग नियंत्रक यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे अशा आमिशाला बळी न पडण्याचे आवाहन एसटी महामंडळ प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

एसटी महामंडळाने पहिल्यांदाच अनुसूचित जमातीच्या धुळे, नंदुरबार, जळगाव व नाशिक या जिल्हातील तरुणांसाठी अशा प्रकारे भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे.  सुरुवातीला पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांचे सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, यात जे उमेदवार अंतिम सर्व परीक्षा यशस्वी होतील, त्यांना एसटी महामंडळातील रिक्त जागांनुसार व त्या वेळेच्या परिस्थिती नुसार सेवेत सामावून घेण्यात येणार आहे. मात्र, असे असताना बाहेरील काही दलाल या अनुसूचित जमातीच्या युवकांशी संपर्क साधून त्यांना एसटी महामंडळात नोकरीचे आमिष दाखवित आहेत.

काही एसटी कर्मचाऱ्यांमार्फत सबंधित तरुणांनी हा प्रकार धुळे विभागाचे विभाग नियंत्रक विजय गिते यांच्या कानी घातला आहे. त्यामुळे गीते यांनी संबधित जमातीच्या उमेदवारांनी एसटी भरती प्रक्रियेत कुठलेही गैरप्रकार चालत नाही. प्रशिक्षणासाठी पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होणार आहे. त्यामुळे तरुणांनी कुठल्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन विजय गिते यांनी केले आहे.

एसटी महामंडळातर्फे धुळे विभागा मार्फत अनुसूचित जमातीच्या युवकांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण देऊन, यात यशस्वी होणाऱ्या युवकांना रिक्त जागेनुसार सेवेत घेण्यात येणार आहे. मात्र, यात काही दलाल मंडळी या अनुसूचित जमातीच्या युवकांशी संपर्क साधून, त्यांच्याकडे आर्थिक आमिष मागून, एसटी महामंडळात नोकरी लावून देण्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. त्यामुळे तरुणांनी अशा कुठल्याही आमिषाला बळी पडू नये, प्रशिक्षणाची व त्या नंतर सेवेत घेण्याची प्रक्रिया पारदर्शक होणार आहे. यात  कोणाचीही वशिलेबाजी ना दलाली चालणार नाही. 

विजय गिते, विभाग नियंत्रक, धुळे.

टॅग्स :Dhuleधुळे