शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: ३० सप्टेंबरपर्यंत मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेणार, सरकारने लेखी दिले: मनोज जरांगे पाटील
2
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
3
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
4
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य
5
शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या
6
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
7
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला का बांधला जातो अनंताचा धागा? हे व्रत गणेशाचे नाही तर... 
8
भाक्रा धरणापासून एअरबेसपर्यंत पाकिस्तानला दिली माहिती; प्रसिद्ध युटयूबर विरोधात आरोपपत्र दाखल
9
"पूर नव्हे, हा तर देवाचा आशीर्वाद"; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला दिला अजब सल्ला! म्हणाले...
10
'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले
11
'सरकारचा एकही प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांना भेटायला आला नाही,' रोहित पवारांची टीका
12
सेबीचा नवा नियम! F&O ट्रेडिंगमध्ये १ ऑक्टोबरपासून पोझिशन लिमिट वाढणार; लहान गुंतवणूकदारांना फायदा
13
स्वार्थी ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'नंतरही भारताची अर्थव्यवस्था 'बम-बम'! ग्रोथ पाहून पंतप्रधान मोदीही खूश; स्पष्टच बोलले...
14
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
15
'या' देशात भाड्याने मिळते पत्नी; लग्न करून एकत्रही राहू शकता, पण मोजावे लागतील 'इतके' पैसे!
16
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक
17
Ganesh Visarjan: गौरी-गणपतीच्या निरोपासाठी जय्यत तयारी
18
बुरख्यातली गर्लफ्रेंड निघाली मुलगा! एकत्र प्रवास करूनही ओळखू शकला नाही बॉयफ्रेंड; पुढचं ऐकून व्हाल हैराण
19
अवनीत कौरने विराट कोहलीच्या इंस्टाग्राम पोस्ट लाइकवर सोडलं मौन, म्हणाली - "मी कधीच विसरत नाही..."
20
"अकाली एक्झिट वगैरे शब्द...", प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिजीतची भावुक पोस्ट

पाणी भरण्याचा वाद, तरुणाला मारहाण

By admin | Updated: May 29, 2017 01:17 IST

बोरीस येथील घटना : धुळे तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

धुळे : तालुक्यातील बोरीस येथे नळावर पाणी भरण्याच्या वादातून तरुणाला हाताबुक्क्यांनी मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली़ याप्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आह़ेयाबाबत मुकेश सुभाष पवार (रा़बोरीस, ता़धुळे) या तरुणाने सोनगीर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गावातील दादाभाई पवार यांच्या नळावर पाणी भरण्याच्या कारणावरून मुकेश व पूनम बबलू पाटील (रा़बोरीस) या दोघांमध्ये वाद झाला़ त्यानंतर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पूनम पाटील हिने चिथावणी दिल्याने कौतीक यशवंत पाटील, मुन्ना कौतीक पाटील, बबलू कौतीक पाटील या तिघांनी मुकेश यास हाताबुक्क्यांनी मारहाण केली़ यात मुकेश याला मुकामार लागला़ तसेच त्याला जातीवाचक शिवीगाळ करून अपमानीत केल़े, असे फिर्यादीत नमूद केले आह़े यावरून वरील  चौघांविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 1989 सुधारित अधिनियम सन 2016 चे कलम 3/1 आर एस 6 तसेच भादंवि कलम 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश सोनवणे करीत आहेत़नवडणे येथे एकास मारहाणसामाईक रस्त्यावरून बैलगाडी नेल्याच्या कारणावरून संजय तान्हाजी देसले (रा़ कासारे, ता़ साक्री) यांना नवडणे शिवारातील शेट गट क्रमांक 302/3/1 च्या बांधावर किरण राजाराम देसले, सुभाष देसले व अन्य दोन महिला या चौघांनी हाताबुक्क्यांनी तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केल़े ही घटना बुधवारी सकाळी 8़30 वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी संजयचे वडील तान्हाजी तळपत देसले यांनी साक्री पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वरील चौघांविरुद्ध भादंवि कलम 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़ेबेटावद येथे तरुणाला मारहाणशिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथील रहिवासी विजय हसरथ भिल या तरुणाने पोलीस ठाण्यात अर्ज दिल्याच्या कारणावरून त्याला शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास त्याच्या घरासमोर अजय दशरथ भिल, प्रकाश सुरेश भिल, राजू दशरथ भिल (रा़बेटावद) या तिघांनी हाताबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली़  याप्रकरणी त्याने नरडाणा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून वरील तिघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पो़ना. फुलपगारे करीत आहेत़ कलमाडी येथे मारहाणशिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील रहिवासी योगेश भटू पाटील यांनी 25 मे रोजी विजेंद्र छबीलाल पाटीलसह इतरांविरुद्ध फिर्याद दिली होती़ याचे वाईट वाटून शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास कलमाडी गावात शिवाजी चौकात योगेश पाटील यांना विजेंद्र पाटीलसह युवराज धुडकू पाटील, पुरुषोत्तम पाटील (रा़कलमाडी) या तिघांनी हाताबुक्क्यांनी मारहाण    करून शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली़ याप्रकरणी त्याने नरडाणा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून वरील तिघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पो़ना. मुजगे करीत आहेत़ कासारेत विहिरीत आढळला मृतदेह साक्री तालुक्यातील कासारे गाव शिवारातील गट क्रमांक 633 या शेतातील विहिरीत एका तरुणाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला़ त्याचे वय अंदाजे 25 ते 30 वर्षे वर्ष आह़े ही घटना शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता उघडकीस आली़ संबंधित तरुण 2 ते 3 दिवसांपूर्वी विहिरीत पडला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े याबाबत किरण पन्नालाल भावसार (रा़कासारे) यांनी साक्री पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्ताम मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े तपास पो़ह़ेकॉ. पायमोडे करीत आहेत़