शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'आयआरसीटीची' वेबसाईट बंद! मध्य रेल्वेने ३० ठिकाणी सुरू केल्या अतिरिक्त तिकीट खिडक्या  

By सचिन देव | Updated: July 25, 2023 18:21 IST

भारतीय रेल्वेच्या आयआरसीटीसीची वेबसाइट मंगळवारी पहाटे तीन पासून तांत्रिक कारणामुळे बंद पडल्याने, ऑनलाईन तिकीट काढणाऱ्या प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली होती.

धुळे: भारतीय रेल्वेच्या आयआरसीटीसीची वेबसाइट मंगळवारी पहाटे तीन पासून तांत्रिक कारणामुळे बंद पडल्याने, ऑनलाईन तिकीट काढणाऱ्या प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली होती. यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी मंगळवारी सकाळपासून राज्यातील विविध स्टेशनवर एकूण ३० अतिरिक्त तिकीट खिडक्या सुरू केल्या होत्या. अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी 'लोकमत'शी बोलतांना दिली. तसेच बंद झालेली आयआरसीटीसीची वेबसाईट मंगळवारी दुपारी १ वाजुन २८ मिनिटांनी पुर्ववत झाली असून,  वेबसाईटचे तांत्रिक कारण हे दिल्लीत उद्भवले  असल्याचेही डॉ. मानसपुरे यांनी सांगितले. 

आयआरसीटीचीच्या वेबसाइट आणि  ॲपवरून ७० टक्के प्रवासी ऑनलाईन तिकीट बुकिंग करण्याला प्राधान्य देत असतात. यामुळे प्रवाशांचा रांगेत उभे राहण्याचा मोठा वेळ वाचत असतो. मात्र, मंगळवारी पहाटे २ वाजुन ५६ मिनिटांनी आयआरसीटीसीची वेबसाईटच बंद पडली होती. तांत्रिक बिघाडामुळे वेबसाईट बंद पडल्याने प्रवाशांचे तिकीट बुकिंग करणे बंद झाले होते. या प्रकाराची माहिती मिळतात मध्य रेल्वे प्रशासनाने मंगळवारी सकाळी सातपासून मुंबई, पुणे, नाशिक, नागपुर, सोलापुर, जळगाव, अकोला या सर्व ठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त तिकीट खिडक्या सुरू करण्याचे आदेश देऊन, तात्काळ या तिकीट खिडक्या सुरू करण्यात आल्या होत्या. मंगळवारी दुपार पर्यंतदेखील वेबसाईट सुरू न झाल्यामुळे, भुसावळ, जळगाव, नाशिक या ठिकाणच्या स्टेशनवरील खिडक्यांवर प्रवाशांंची गर्दी वाढतांना दिसून आली.

तब्बल साडे दहा तासांनी सुरू झाली वेबसाईट... सोमवारी पहाटे २ वाजुन ५६ मिनिटांनी बंद झालेली आयआरसीटीसीची वेबसाईट, मंगळवारी दुपारी १ वाजुन २८ मिनिटांनी म्हणजे  तब्बल साडे दहा तासांंनी ही वेबसाईट सुरू झाली. दरम्यान, आयआरसीटीसीने देखील तांंत्रिक कारणामुळे वेबसाईट बंद पडल्याचे ट्वीटर वरून जाहिर केले होते. तसेच गैरसोय दुर करण्यासाठी प्रवाशांना अमेझॉन, मेक माय ट्रीप, या वरून तिकीट काढण्याचे आवाहन केले होते.  

आयआरसीटीची वेबसाईट बंद पडल्यानंतर, प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने नाशिक, अकोला, भुसावळ यासह इतर स्टेशन मिळून ३० ठिकाणी अतिरिक्त तिकीट खिडक्या सुरू केल्या होत्या. वेबसाईट बंदच्या काळात ऑनलाईन तिकीट बुकिंगच्या उत्पन्नावर फारसा परिणाम झाला नाही. बंद झालेली वेबसाईट मंगळवारी दुपारी सुरू झाली. - डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.

टॅग्स :Dhuleधुळे