लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : करन्सी ट्रेडमध्ये गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा मिळेल, असे सांगितल्याने एका महिलेने यात ५० लाख रुपये गुंतविले़ मात्र, आकर्षक परतावा तर सोडाच मूळ रक्कमही मिळत नसल्याने या महिलेने पोलिसात तक्रार नोंदविली़ त्यानुसार, पुणे येथील एकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे़ शहरातील गल्ली नंबर ४ मध्ये राहणाºया जयश्री दीपक वैष्णव या ४० वर्षीय महिलेला पुण्यातील आशिष राजू हुंडेकर या संशयिताने झुलू ट्रेड नावाच्या करन्सी ट्रेडमध्ये गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा मिळेल, असे सांगितले होते़ त्यानुसार, जयश्री वैष्णव यांनी २५ नोव्हेंबर २०१६ ते १ डिसेंबर २०१६ दरम्यान मॉडेल को-आॅपरेटिव्ह बँक ठाणे येथील हुंडेकर यांच्या खात्यात १५ लाख रुपये आरटीजीएसने भरले़ तर ३५ लाख रुपये त्यांना रोख दिले होते़ दरम्यानच्या काळात मुद्दलासह कुठलीही रक्कम परत मिळत नसल्याने जयश्री वैष्णव यांनी गुरुवारी रितसर शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली़त्यानुसार, पुण्यातील आशिष हुंडेकर या संशयिताविरुध्द भादंवि कलम ४२०, ४०६ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत़
गुंतवणुकीचे आमिष महिलेची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 21:45 IST