शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
3
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
4
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
5
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
6
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
7
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
8
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
9
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
10
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
11
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
12
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
13
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
14
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
15
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
16
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
17
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
18
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
19
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
20
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
Daily Top 2Weekly Top 5

२५० उपवर-वधूंनी दिला परिचय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 22:28 IST

साक्री : खान्देशातून मराठा समाजातील नागरीकांची होती उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री : साक्री तालुका मराठा समाज उन्नती मंडळ व मराठा शुभ लग्न डॉट कॉम यांच्या संयुक्त विद्यमाने साक्री येथील बालआनंद नगरीत तालुक्यात प्रथमच मराठा वधु-वर व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते़ सदर मेळाव्यात २५०  युवक-युवती व त्यांच्या पालकांनी आपला परिचय करून दिला.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी साक्री तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पराग बेडसे होते़ माजी प्राचार्य बी़ एस़ पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य विलास बिरारीस, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पोपटराव सोनवणे, मराठा समाज उन्नती मंडळ पिंपळनेरचे सुरेंद्र मराठे, डी. पी. पाटील, आर. एस. कदम, संस्थेचे सेक्रेटरी गजेंद्र भोसले, उत्तमराव वंजी देवरे, शुभलग्न डॉट कॉम चे संचालक हेमंत पगार, नगरसेवक शरद भामरे, पुनम शिंदे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जितेंद्र मराठे, भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय अहिरराव, जयवंतराव ठाकरे, उत्पल नांद्रे, भैय्यासाहेब सोनवणे, संजू पाटील, दीपक अहिरराव आदी मान्यवर उपस्थित होते.तालुक्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर या वधू-वर परिचय मेळाव्यास प्रतिसाद मिळाला़ त्यामुळे मराठा समाजातील कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले असे मान्यवरांनी यावेळी गौरवोद्गार काढले. आर्थिक परिस्थिती नसलेल्या पालकांना यात सवलत देत त्यांच्यासाठी मोफत नोंदणी करण्यात आली. नाशिक येथील शुभलग्न डॉट कॉम संचालक हेमंत पगार यांनी सर्वच युवक-युवतींचा परिचय करून दिला. मेळाव्यास साक्री तालुका एज्युकेशन सोसायटी, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, पाटील परीवार व तालुक्यातील समस्त मराठा समाजाचे सहकार्य लाभले. यावेळी बी. एम.भामरे, दिलीप काकुस्ते व बी.एस.पाटील यांनी मार्गदर्शन केले.मेळावा यशस्वीतेसाठी अनिल अहिरे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रवीण मोरे, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा मीना काकुस्ते, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष जयेश सोनवणे, सचिव जितेंद्र अहिरराव, पाटील परिवाराचे शीतल पाटील, राकेश पाटील तसेच सुहास सोनवणे, शालिक बच्छाव, प्रा कांतीलाल सोनवणे, प्रशांत देवरे, डॉ सचिन नांद्रे, ए. बी. मराठे, दगाजी देवरे, किरण नांद्रे, गिरीश रामोळे, डॉ. राजेंद्र अहिरे आदींनी सहकार्य केले. सूत्रसंचालन पी. झेड. कुवर यांनी केले तर प्रास्ताविक विजय भोसले यांनी केले. आभार डॉ. विपीन पवार यांनी मानले. मेळाव्यासाठी  नाव नोंदणी झालेल्यांची संख्या मेळाव्याच्या आदल्या दिवसापर्यंत केवळ ६० होती़ परंतु, मेळाव्याप्रसंगी धुळे, अमळनेर, चोपडा, सुरत अशा विविध ठिकाणाहून मराठा समाज उपस्थित राहिल्याने नोंदणी २५० पर्यंत झाली. याबद्दल पदाधिकाºयांनी समाधान व्यक्त केले़ 

टॅग्स :Dhuleधुळे