शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

धुळे येथे इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनास सुरवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 15:41 IST

प्रदुषणमुक्ती, सौरउर्जेवर भर, प्रदर्शनात १८५ उपकरणे मांडले

ठळक मुद्देविज्ञान प्रदर्शनाचे ७ वे वर्षप्रदर्शनात तीन जिल्ह्यातून १८५ उपकरणे मांडलीप्रदुषणमुक्ती, सौरउर्जेवर सर्वाधिक भर

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : तीन दिवसीय इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनास येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये बुधवारी सकाळी थाटात प्रारंभ झाला. या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी प्रदुषणमुक्ती, सौरउर्जा, पर्यावरण या विषयावर अधिक भर दिला आहे.विज्ञान व तंत्रज्ञान विभाग नवीदिल्ली, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवीनगर नागपूर व शिक्षण विभाग धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने हे जिल्हा विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले आहे. धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील १८५ उपकरणे यात मांडण्यात आली आहेत. विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी. यांच्याहस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रविण अहिरे, डायटच्या प्राचार्या डॉ. विद्या पाटील, राज्य विज्ञान व तंत्रज्ञान विभाग नवीदिल्लीचे सिनीअर एनोव्हेशन फेलो कांती पटेल, छत्रपती शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक डी.पी. राजपूत आदी होते.यावेळी बोलतांना गंगाथरन डी. म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड बुद्धीमत्ता आहे.त्यांच्याकडे नवनवीन कल्पना आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता ओळखून शिक्षकांनी त्यांना चालना दिली पाहिजे.  विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नांचे निरसन करण्याचा प्रयत्न शिक्षकांनी केला पाहिजे.कांती पटेल म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये नवीन करण्याची क्षमता निर्माण झाली पाहिजे. यातूनच चांगले शास्त्रज्ञ निर्माण होवू शकतात. डॉ. विद्या पाटील यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रविण अहिरे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार डी.पी.मराठे यांनी केले.१८५ उपकरणे मांडलेया इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात  १८५ उपकरणे मांडण्यात आली आहे. त्यात धुळे जिल्ह्यातील ८६, जळगाव जिल्ह्यातील ५९ तर नंदुरबार जिल्ह्यातील ४० उपकरणांचा समावेश आहे.