शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

थाळनेरला पाणीपुरवठा योजनेची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:35 IST

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, धुळे यांच्यामार्फत शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे सन २०१७/२०१८मध्ये एक कोटी ...

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, धुळे यांच्यामार्फत शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे सन २०१७/२०१८मध्ये एक कोटी २७ लाख ६९ हजार ७४३ रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती. या योजनेचे काम ठेकेदाराने १५ महिन्यांत पूर्ण करून त्यानंतर किमान तीन वर्षे योजना चालविणे कंत्राटदारावर बंधनकारक होते. योजना पूर्ण झाल्यानंतरच ठेकेदाराला अंतिम देयके अदा करण्यात येणार होती. परंतु ठेकेदाराने संथगतीने व निकृष्ट दर्जाचे काम केले. त्यामुळे ४ वर्षांनंतरही ही योजना पूर्ण झालेली नाही. या योजनेबाबत ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत व नागरिकांनी तोंडी तक्रारी केल्या होत्या. याबाबत पंचायत समिती सदस्य विजय बागुल यांनी गटविकास अधिकारी शिरपूर यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्या अनुषंगाने गटविकास अधिकारी शिरपूर यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जि. प. धुळे यांना लेखी कळविले होते. ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्‍हा परिषद धुळे यांनी सदर तक्रारीची दखल घेऊन पाणीपुरवठा योजना कामाची चौकशी करून अहवाल तत्काळ कार्यालयास सादर करण्यासंबंधीचे पत्र उपअभियंता साखरे यांना दिले होते. या पत्राच्या अनुषंगाने तब्बल एक महिन्यानंतर साक्री येथील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उप विभागीय अभियंता ए.आर. पाटील यांनी थाळनेरला चौकशीसाठी भेट दिली. त्यांनी तक्रारीच्या अनुषंगाने बसस्थानकाजवळील पाण्याची टाकी, जमादारपाडा, दामशेरपाडा, मच्छी बाजार आदी भागांत जाऊन पाहणी केली. या वेळी संबंधित अधिकाऱ्यांवर नागरिकांनी तोंडी तक्रारींचा भडिमार केला. नागरिकांनी अनेक भागांत जुन्या पाइपलाइनद्वारे पाणी येत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच अनेक भागांत आजपर्यंत नवीन पाणीपुरवठा योजनेतून पाणीच आले नसल्याचे सांगितले. तसेच अनेक ठिकाणी पाण्याची गळती दाखविली. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यताही बोलून दाखवली.

या वेळी पंचायत समिती सदस्य विजय बागुल, ग्रामपंचायत सदस्य नवनीत वाडीले, श्याम भील, विकास सोसायटीचे चेअरमन दिनकरराव पाटील, मुकेश ठाकरे, कुबेर जमादार, दिलीप कोळी, रवींद्र तवर, रामकृष्ण बोरसे, अक्षय पाटील, भैरव जमादार, सुनील पाटील, ग्राम विकास अधिकारी वेताळे व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. दरम्यान, सदर अधिकाऱ्यांनी २/३ तासांत चौकशी आटोपती घेतल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.