शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

आधुनिक बुध्दीबळात शंभराचा नाविन्यपूर्णशोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 22:08 IST

बाळकृष्ण तांबे । धुळ्याच्या सुपुत्राचे संशोधन

संडे हटके बातमी -वसंत कुलकर्णी । लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :   बुद्धिबळ या खेळाचा उगम भारतात झाला असून आज आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा चाहता वर्ग आहे. जगातील प्रसिद्ध खेळांपैकी एक खेळ म्हणून बुद्धिबळाची ओळख आहे. बुद्धीला चालना देणाºया खेळाला आधुनिकतेची जोड देत एक नवा आविष्कार म्हणून आधुनिक बुद्धिबळ १०० चे  संशोधन मूळचे धुळ्याचे प्रा.बाळकृष्ण तांबे यांनी केले आहे.व्यवसायाने अभियंता बाळकृष्ण तांबे यांनी पुणे येथे नौकरी करत असताना मुलाला बुद्धिबळ शिकवायला सुरवात केली. तेव्हा पारंपरिक खेळात त्यांना त्रुटी जाणवल्या. आणि जास्तीस्त जास्त रंजक व खेळाचा निकाल लागेल या दृष्टीने  १० ते १५ वर्ष विविध अंगाने संशोधनाला सुरवात करत आधुनिक बुद्धिबळ १०० ची निर्मिती झाली. पारंपरिक बुद्धी बळात ६४ घरे आणि ३२ सोंगट्या असल्याने चाली रचताना ३२ घरांचा वापर पुरेसा वाटला नाही़ म्हणून आधुनिक बुद्धीबळात १०० घरे आणि ४० सोंगट्या वापरल्या जात असल्याने खेळ अधिक आकर्षक, रंजक, गतिमान आणि आव्हानात्मक करण्यासाठी गणितातील दशमान पद्धतीचा वापर त्यांनी केला आहे. आधुनिक बुद्धिबळ १०० ही पुस्तिका लिहिली आहे. यात आधुनिक बुद्धिबळाच्या माध्यमातून खेळातील बदल नव्या खेळाची रचना नियम, मोहºयांची नावे या विषयी माहिती पुस्तिकेत देण्यात आली आहे. या बुद्धीबळ संपदेचे हक्क केंद्र सरकारकडे नोंदणीकृत असून एकंदरीत या खेळातील संशोधन बुद्धीला चालना देण्यासाठी एक उत्तम माध्यम म्हणून येणाºया काळात आधुनिक बुद्धिबळाच्या रुपात खेळले जाईल, असे मत त्यांनी ‘लोकमत’शी  संवाद साधताना मांडले. बुद्धिबळात काल्पनिक पध्दतीने युद्ध खेळले जात.े काळानुरूप नियमात बदल होत जाऊन संगणकामध्ये प्रोग्रामिंग करून बुद्धीबळ खेळले जाऊ लागले असले तरी त्यात हवी ती गतिमानता नसल्याने तरूण पिढी व्हिडियो गेम्सकडे जेवढी आकर्षीत होतात, तेवढी बुद्धिबळ खेळण्यासाठी आकर्षीत होत नाहीत . आधुनिक बुद्धिबळ १०० खेळण्यासाठी अधिक वेगवान असल्याने  बौद्धिक एकाग्रता स्मरणशक्ती सुधारणेसोबत सर्जनशील माध्यम म्हणून उपयुक्त आहे़आधुनिक काळानुसार सुसंगत बदल करत राजेशाही संपुष्टात आल्या नंतर सध्याच्या लोकशाही रूढ झाली असून त्या नुसार सोंगट्यांची रचना व नावे देण्यात आली आहेत. ज्यात  अध्यक्ष, सेनापती, सैनिक कमांडो, रणगाडा, तोफ, बाँम्बर, अशी नावे दिली आहेत. आधुनिक बुद्धिबळात दुहेरी पद्धतीने खेळणे ही शक्य आहे. मोरोपंत तांबे यांच्या कन्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई घराण्यातील प्रा़बाळकृष्ण तांबे हे वंशज आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे