शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बदली प्रक्रियेत अन्याय झाल्याने  शिक्षकाचे धुळे जिल्हा परिषदेसमोर कंदिल लावून बिºहाड आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 12:37 IST

न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार

ठळक मुद्देअमृतसागर यांना बेकायदेशीर विस्थापित करण्यात आलेविस्थापित करण्याबाबत कुठलाही आदेश दिला नाहीन्याय मिळण्यासाठी शिक्षक दिनापासूनच सुरू केले आंदोलन

लोकमत आॅनलाइनधुळे : जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत पदस्थापना करतांना पती-पत्नी  एकत्रिकरण अंतर्गत झालेला अन्याय दूर करून न्याय मिळावा या मागणीसाठी चिंचखेडे (ता. साक्री) येथील शिक्षक भास्कर निंबा अमृतसागर यांनी  शिक्षक दिनापासून  जिल्हा परिषदेसमोर कंदिल लावून बिºहाड आंदोलन सुरू केले आहे. अमृतसागर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २७ फेब्रुवारी १७ च्या बदली निर्णयानुसार संवर्ग १ व संवर्ग २ यांनी मी जि.प.शाळा सावळदे (ता. धुळे) येथे कार्यरत असतांना मला व माझ्या पत्नी कल्पना झाल्टे (जि.प.शाळा, दिवाणमाळा,ता.धुळे) यांना खो दिल्याने विस्थापित झालो. संवर्ग ४ प्रमाणे बदलीसाठी २० शाळा आॅनलाइन पद्धतीने पसंतीक्रमाने दिल्या. त्यानुसार लळिंग जि.प. शाळा मला देण्यात आली. परंतु पत्नीला विस्थापित यादीत समाविष्ट करण्यात आले. पत्नीला न्याय मिळाला नाही.पती-पत्नी जि.प. सेवेत असतांना व ३० कि.मी.च्या अंतरात असतांना २८ मे १८च्या आदेशान्वये अमृतसागर यांना पुन्हा विस्थापित करण्यात आले. याबाबत जि.प.प्रशासन व शासनस्तराव त्यांना कुठल्याही प्रकारे माहिती देण्यात आलेली नाही. विस्थापित करण्याबाबत कोणताही आदेश दिला नाही. त्यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याचे अमृतसागर यांचे म्हणणे आहे. पती-पत्नी दोघेही ३० कि.मी.च्या आत कार्यरत असतांना संवर्ग ५च्या बदली प्रक्रियेत भास्कर अमृतसागर यांना चिंचखेडे (ता. साक्री) तर त्यांची पत्नी कल्पना झाल्टे यांना बोरकुंड (ता. धुळे) येथे पदस्थापित करण्यात आले. पती-पत्नी एकत्रीकरणात अन्याय होऊ नये असे शासन आदेश आहेत. मात्र भास्कर दाम्पत्याला पदस्थापित केलेल्या गावांमध्ये ७० कि.मी.पेक्षा जास्त अंतर आहे. जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत पदस्थापना करतांना पती-पत्नी एकत्रिकरण अंतर्गत अन्याय झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार केला. मात्र न्याय मिळाला नाही. न्याय मिळावा यासाठी त्यांनी शिक्षक दिनापासून जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर कंदिल लावून बिºहाड आंदोलन सुरू केले आहे. जो पर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी त्यांनी भूमिका घेतली आहे.  भास्कर अमृतसागर हे  संसारपयोगी साहित्य घेऊनच आंदोलनाला बसले आहे. त्यांचे हे आंदोलन लक्षवेधक ठरत आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे