शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

साक्रीत रेशनदुकानदारावर गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 22:31 IST

काळा बाजार : नांदवण ग्रामस्थांची मागणी

ठळक मुद्देकाळ्या बाजारात जाणारा रेशनचा माल नांदवण ग्रामस्थांनी पकडलातहसील प्रशासनाला ग्रामस्थांनी दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : गोर-गरीबांच्या तोंडाचा घास हिरावून नेणाºया, रेशनच्या मालाचा काळाबाजार करणाºया रेशन दुकानदारावर गुन्हा दाखल करावा़ त्याचे दुकान बंद करावे अशी मागणी साक्री तालुक्यातील नांदवण येथील ग्रामस्थांनी नायब तहसीलदार तथा प्रभारी पुरवठा निरीक्षक अधिकारी विनोद ठाकूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. साक्री तालुक्यातील नांदवण गावात गरीबांसाठी असलेले तांदूळ, गहू, साखर आणि अन्य साहित्य प्रशासनाकडून अद्यापपावेतो मिळालेला नाही़ गावकºयांचे रेशन कार्ड हे रेशनदुकानदाराकडे जमा करुन ठेवलेले आहेत़ असा आरोप साक्री पोलीस स्टेशनमध्ये नांदवण गावातील महिलांनी सोमवारी रात्री केला होता़ रेशन दुकानदारावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी गावातील शेकडो महिला-पुरुषांनी सोमवारी रात्री साक्री पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडले होते़ यावेळेस तहसील कार्यालयातील अधिकारी आल्याशिवाय आम्ही कारवाई करु शकत नाही, असे पोलिसांनी ग्रामस्थांना सांगितले आणि ग्रामस्थांना सकाळी येण्याचा सल्ला पोलिसांनी दिल्यामुळे ग्रामस्थ निघून गेले होते़ मंगळवारी सकाळी ग्रामस्थांनी नायब तहसीलदार ठाकूर यांना निवेदन सादर केले़ रेशन दुकानदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी लावून धरली होती़ यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख विशाल देसले,  वसंत साळुंखे, नितीन देवरे, किरण माळीच, किशोर शिंदे, आप्पा माळीच, विलास माळीच, जिभाऊ सोनवणे, सुभाष माळीच, मोहन टेळे, शांताराम पवार, पोपट माळीच, आबाजी साळुंके, सुरेश ठाकरे, नंदलाल पगारे, सुदाम माळीच, छोटू अहिरे, लक्ष्मण अहिरे, राजाराम शिंदे, सुनील ठाकरे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते़ 

टॅग्स :DhuleधुळेSakriसाक्री